VIDEO: मोदींच्या सभेत भाजप मंत्र्याने महिला मंत्र्याचा केला विनयभंग

त्रिपुरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोनोज कांती देव यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे.

Tripura
BJP Minister manoj kanti deb
भाजपचे मंत्री मनोज कांति देव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभे दरम्यान, भाजपच्या एका मंत्र्यांने महिला मंत्र्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्रिपुरा येथे जाहीर सभा झाली. या सभेच्याआधी समारंभाच्या फलकाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बिप्लब देव उपस्थित होते. या उद्घाटनावेळीच भाजपच्या मंत्र्याने त्याच्यासमोर उभ्या असलेल्या महिला मंत्र्याचा विनयभंग केला. या घटनेवरु सध्या भाजपच्या या मंत्र्यावर जोरदार टीका होत आहे. तर भाजपानेच हा चरित्रहनन करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

त्रिपुरातील मोदींच्या सभे दरम्यान राज्यमंत्री मनोज कांती देव यांनी त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या महिला मंत्री संतना चकमा यांचा विनयभंग केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भाजप नेते संतना चकमा यांच्या कमरेला हात लावताना दिसत आहेत. मात्र याप्रकरणी महिला मंत्र्याने कुठलिही तक्रार दाखल केली नाही. मात्र या व्हिडिओवरुन सध्या विरोधक खूप आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यमंत्री मनोज कांती देव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच त्रिपुरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोनोज कांती देव यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे.

पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी

राज्यमंत्री मनोज कांती देव यांनी केलेल्या कृत्याविरोधात सीपीआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सोमवारी अगरतला येथे रस्त्यावर उतरुन जोरदार घोषणाबाजी केल्या. सीपीआयएमचे नेते बिजन धर यांनी सांगितले की, ज्या मंचावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यासोबत अन्य जण उपस्थित आहेत अशा ठिकाणी राज्यमंत्री महिला मंत्र्यांचा विनयभंग करतात हे अतिशय धक्कादायक आणि निंदनिय आहे. त्यांनी सांगितले की, जर मनोज कांती देव जर राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्याची हकालपट्टी करावी आणि त्यांना अटक करण्यात यावी.