घरदेश-विदेशउर्दूत शुभेच्छा दिल्याने पंतप्रधान मोदी ट्विटरवर ट्रोल

उर्दूत शुभेच्छा दिल्याने पंतप्रधान मोदी ट्विटरवर ट्रोल

Subscribe

मुस्लीम बांधवाना उर्दूत रमजानच्या शुभेच्छा दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर ट्रोल झाले आहे. पंतप्रधानांनी प्रथम उर्दू आणि त्यानंतर इंग्रजीतून रमजानच्या शुभेच्छा दिल्या. याच बरोबर आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारेही त्यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र ट्विटरवर दिलेल्या शुभेच्छांना ट्विटरकरांनी चांगलेच ट्रोल केले आहे. यावेळी अनेक लोकांनी आपली पातळी सोडून पंतप्रधानांवर टीका केली आहे.

भारतीय राज्यघटनेनुसार अधिकृत भाषांमध्ये उर्दू भाषेचा बावीसावा क्रमांक लागतो. उर्दू ही फक्त मुस्लीमांची भाषा आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. उत्तर भारतीयांमध्येही मोठ्या प्रमाणात उर्दू वापरली जाते. यापूर्वीही प्रंतप्रधांनानी संस्कृतमध्ये ट्विट केले होते. त्या ट्विटला लोकांनी विरोध दर्शवला नव्हता. जगात ६ हजार ५०० बोली भाषा आहेत. ज्यापैकी भारतामध्ये एक हजार ६०० भाषा बोलल्या जातात.

- Advertisement -

– ‘मन की बात’ माध्यमातून दिलेला संदेश 

- Advertisement -

माझ्या देशबांधवांनो रमझानचा महिना सुरु झाला आहे. या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. जो माणूस उपाशी असतो त्याला दूसऱ्यांच्या भूकेची जाणीव असते. जो माणूस तहानलेला असतो त्यालाच दूसऱ्याची तहान जाणवू शकते. ही शिकवण रमझानच्या निमित्ताने आपल्याला मिळते. पैंगबर मोहम्मद यांची शिकवण आणि त्यांनी दिलेल्या उपदेश ही गोष्ट आपल्या ध्यानात ठेवली पाहिजे. तुमच्याकडे कोणतीही गोष्ट आवश्यकतेपेक्षा अधिक असेल तर ती गोष्ट गरजूंना द्यावी, असा संदेश पैंगबर यांनी दिला होता. कोणतीही व्यक्ती पैशाने नाही तर आपल्या पवित्र आत्म्याने श्रीमंत बनू शकते, अशा प्रकारचा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -