‘या’ डेटिंग अॅपची दिल्लीत क्रेझ! करोडोंची उलाढाल

'ट्रूली मॅडली' हे अॅप दिल्लीमध्ये भलतंच फेमस आहे. गेल्या वर्षभरात या अॅपच्या माध्यमातून तब्बल ७.२ कोटींची उलाढाल झाली होती.

Mumbai
TrulyMadly
फोटो सौजन्य- entrackr.com

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘डेटिंग’ करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. ‘टिंडर’ या अॅपविषयी तुम्ही ऐकलंच असेल. या प्रकारच्या अॅप्सद्वारे सर्वात आधी दोन अनोळखी व्यक्तींची ओळख होते. त्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटतात आणि एकमेकांना एकमेकांची पसंती मिळाल्यास पुढे नियमीत डेट करु लागतात. संशोधनामधून समोर आलेल्या माहितीनुसार ३५ ते ५० वर्ष वयोगटातीलही अनेक लोक परफेक्ट पार्टनर शोधण्यासाठी अशा अॅप्सचा वापर करतात. दिल्लीतील लोकांना अशाच एका अॅपचं वेड लागलंय, ज्याचं नाव आहे ‘ट्रुली मॅडली‘. ट्रुली मॅडली हे अॅपही टिंडरप्रमाणेच एकमेकांसारखी आवड असणाऱ्या २ अनोळखी व्यक्तींची भेट घालून देणारं अॅप आहे.

‘ट्रुली मॅडली’मुळे कोट्यावधींची उलाढाल

ट्रुली मॅडली या अॅपने दिल्ली वासीयांनी चांगलंच वेड लावलं आहे. दिल्लीतील लोक खूप मोठ्या प्रमाणावर हे अॅप वापरत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. दिल्लीमध्ये ट्रुली मॅडली अॅप वापरणारे लोक आणि त्यामुळे अॅपला मिळणारं उत्पन्न यांचं प्रमाण इतकं जास्त आहे, की एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या आर्थिक वर्षांत त्याने तब्बल ७.२ कोटींची उलाढाल केल्याचं समोर आलं आहे. २०१४ साली ट्रुली मॅडली अॅपचा भारतामध्ये अधकृतरित्या वापर व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर पुढील २-३ वर्षांत लोकांमधली या अॅपची क्रेझ वाढत गेली. ही क्रेझ इतक्या झपाट्याने पसरली की या अॅपला काही लाखांच्या वर सबस्क्राईबर्स मिळाले. आज दिल्लीकरांमध्ये हे अॅप जबरदस्त ट्रेंडिग आहे. लोकांमध्ये या अॅपची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय आहे ‘ट्रुली मॅडली’ ?

टिंडर प्रमाणेच ट्रुली मॅडली हे ऑनलाईन डेटिंगचं एक अॅप आहे. या अॅपमध्ये लॉग इन करतेवेळी तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागत नाही. त्यामुळे खास करुन मुलींसाठी हे अॅप सुरक्षित असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. याशिवाय अॅपमध्ये बनवण्यात आलेल्या काही स्टिकर्सद्वारे तुम्ही तुमच्या भावना तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकता.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here