जो बायडेन यांच्या विजयानंतरही ट्रम्प हार मानण्यास तयार नाहीत

जो बायडेन यांच्या विजयानंतरही ट्रम्प हार मानण्यास तयार नाहीत

अमेरिकेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत ट्विट अकाऊंटवर अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचे अभिनंदन केले आहे. एकाबाजूला जो बायडेन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर दुसऱ्याबाजूला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हार मानण्यास तयार नाही आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करून आपण विजयी झाला असल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केले असून त्यामध्ये लिहिले आहे की, ‘पर्यवेक्षकास मजमोजणी कक्षात प्रवेश घेण्याची परवानगी दिली नाही. मला ७ कोटी १० लाख वैध मत मिळाली आहेत, ही निवडणूक मी जिंकलो आहे. सर्वात वाईट बाब म्हणजे पर्यवेक्षकांना मतमोजणी कक्ष पाहण्यास परवानगी नव्हती. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. मोठ्या संख्येने मेल इन बॅलेट्स न मागताही ते जनतेला पाठवले होते.’

तसेच ट्रम्प यांनी अजून एका ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘७ कोटी १० लाख वैध मत. अमेरिकेच्या इतिहासात सध्याच्या राष्ट्राध्यक्षांना मिळालेली सर्वाधिक मतं!’ ही वैध मत मोजली तर मीच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होईन असे म्हणत रिपब्लिक पक्षाचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये फेर मतमोजणी करण्याची मागणी ट्रम्प यांनी केली असून सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. प्रचार यंत्रणेने काही राज्यांत निवडणूक प्रक्रियेला आक्षेप घेणाऱ्या याचिक दाखल केल्या आहेत. पण यामधल्या अनेक याचिका फेटाळून लावण्यात आल्या असल्या तरी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा ट्रम्प यांचा इरादा पक्का आहे.

याआधी २०२०मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यात फ्लोरिडामधील मतमोजणी दरम्यान तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी जॉर्ज बुश यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. जॉर्ज बुश यांची सर्वोच्च न्यायालयाने मागणी मान्य करून फेरमतमोजणीचा आदेश दिला होता. आता देखील ट्रम्प यांना काही राज्यांत फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायलात सहा न्यायाधीशांपैकी तीन न्यायाधीश ट्रम्प यांच्या प्रशासनाने नियुक्त केले आहे. दरम्यान विद्यमान न्यायाधीश जॉर्ज रॉबर्टस ही याचिका दाखल करून घेण्यास फारसे उत्सुक नाही आहे. यामुळे ट्रम्प यांचा सर्वोच्च न्यायालयात जाण्यात मार्ग थोडा अवघड असल्याचे दिसून येत आहे.

ट्रम्प यांच्या पार्टीने असाही आरोप केला आहे की, मोठ्या प्रमाणात मेल इन बॅलेटस निश्चित वेळी ८ वाजल्यानंतर आले. नियमानुसार तेव्हा मतदान संपले होते. या मताची मोजणी केली जावू नये, अशी ट्रम्प यांची मागणी होती. दरम्यान पेनसिल्व्हेनिया येथील कोर्टाने स्पष्ट केले आहे की, जर निवडणुकीच्या दिवसापूर्वी बॅलेट पाठविले गेले असले तर निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच ३ नोव्हेंबरनंतर २ दिवसांनी मत मिळतात. ज्याची गणना केली जाऊ शकते.

डोनाल्ड ट्रम्प आपली हार स्वीकारत नाही आहे, असे दिसत आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांना धमकी देताना म्हटले होते की, ‘जबरदस्तीने आणि चुकीच्या मार्गाने राष्ट्राध्यक्षपदाचा दावा करू नये. असा दावा ते देखील करू शकतात. आता तर कायदेशीर लढाई सुरू आहे.’ जो बायडेन यांच्या विजयानंतर ट्रम्प यांनी मध्यरात्री एकामागून एक असे अनेक ट्विटस केले आहेत.


हेही वाचा – कमला हॅरिस आपल्या की त्यांच्या?