अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ?

डोनाल्ड यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी दिली कबूली, निवडणुकीदरम्यान आयटी कंपन्यांना दिले होते पैसे. पेमेंटबद्दल माहिती असल्याचे ट्रम्प यांनी केले वक्तव्य.

Washington
donald trump with lawyer
प्रातिनिधिक फोटो

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांना मॅनहॅटनच्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २०१६ च्या निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी आयटी कंपनीला पैसे दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याचबरोबर ट्रम्प यांच्याशी लैगिंकसंबध असलेल्या पॉर्नस्टारलाही पैसे देऊन गप्प केल्याची मायकेल यांनी कबूली दिली. या माहितीमुळे पुढील काळात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितल्या जात आहे. दरम्यान या खटल्यावर अद्याप ट्रम्प यांनी कोणतेच वक्तव्य केले नाही. ट्रम्प यांचे माजी प्रचारप्रमुख पॉल मॅनफोर्ट आणि माजी वकील मायकेल कोहेन वेगवेगळ्या गुन्ह्यंत दोषी आढळले आहेत.

निवडणुकीत घेतली सोशल मीडियाची मदत

अमेरिकेत झालेल्या २०१६ च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाचा वापर केला असल्याचा आरोप विरोधकांनी लावला होता. तसेच आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या पैशाचा वापर केल्याचे बोलले जात होते. मागील अनेक महिन्यांपासून या प्रकरणी चौकशी सुरु होती. मात्र ट्रम्प यांच्या माजी वकीलाने कबूली दिल्यानंतर न्यायालय काय कारवाई करेल याकडे सर्वाचे लक्ष आहे. मंगळवारी या खटल्या संबधीत एक कायदेशीर दस्तऐवज प्रकाशीत करण्यात आला. यामध्ये निवडणुकीदरम्यान एका आयटी कंपनीला ५० हजार डॉलर्सचे (३५लाख रुपये) दिल्याचे मायकेल यांनी न्यायालयात सांगितले. मात्र, या कंपनीचे नाव, पैसे देण्याचे कारण कंपनीने केलेली मदत ही माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे. कंपनीला पैसे देण्याव्यतिरिक्त इतर घटनांमध्येही मायकेलने ट्रम्प यांची मदत केली असल्याचे उघडकीस आले.

बँक खात्याच्या चौकशीतून माहिती उघड

निवडणूकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली होती. मायकेल यांच्या बँक खात्याची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांच्या खात्यातून ५० हजार डॉलर्सचे पेमेंट एका आयटी कंपनीला झालेले दिसले. मात्र हे पेमेंट का करण्यात आले याचे उत्तर मायकेल जवळ नव्हते. आयटी सेवेसाठी पैसे देण्यात आल्याचे बचाव पक्षाने म्हटले आहे. निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांच्याशी लैंगिग संबधाचा दावा करणारी पॉर्नस्टार आणि प्ले बॉय मॉडेल महिलेला पैसे देऊन गप्प बसण्यास सांगितले होते.

ट्रम्प यांचे स्पष्टीकरण

या खटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांना स्पष्टीकरण दिले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातील त्यांनी म्हंटले की,”केलेल्या पेमेंटबद्दल मला माहिती होती. मात्र ही माहिती मला निवकडणुकीनंतर दिली गेली. माझ्या वकीलाने निवडणूक प्रचारामध्ये सहभाग घेतला नव्हता. ते फक्त माझ्यासाठी आले होते. मी या पेमेंटबद्दल ट्विट ही केले होते. जर तुम्ही माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा प्रचार पाहिला असेल तर त्यांचा निवडणूक प्रचार याहून मोठा होता.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here