घरदेश-विदेशहैदराबादमध्ये तृप्ती देसाई यांचे आंदोलन

हैदराबादमध्ये तृप्ती देसाई यांचे आंदोलन

Subscribe

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने दिली. यावेळी त्यांच्यासोबत भूमाता ब्रिगेडचे ८ महिला कार्यकर्ते देखील होते. त्यांनी देखील तृप्ती देसाई यांच्यासोबत निदर्शने दिली. त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी तृप्ती देसाई यांना त्यांच्या आठ समर्थकांसह ताब्यात घेतले. हैदराबाद येथे एका डॉक्टर तरुणीवर काही नराधमांनी मिळून पाशवी बलात्कार केला. या बलात्कारानंतर त्यांनी पीडित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या अत्याचारामुळे अखेर पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा यासाठी संपूर्णे देशात आंदोलने केली जात आहे.

दरम्यान, अशाच प्रकारचे एक आंदोलन भूमाता ब्रिग्रेडकडून करण्यात आले. पीडितेला न्याय मिळावा यासाठी तृप्तीत देसाई या पुण्याहून हैदराबादला गेला. तृप्ती देसाई यांनी आपल्या ८ महिला कार्यकर्त्यांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे कार्यालय गाठले. तिथे मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर त्यांनी निदर्शने दिली. यावेळी त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील केली. आंदोलन करण्याअगोदर तृप्ती देसाई यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली. ‘चंद्रशेखर राव यांना लग्नसमारंभात जायला वेळ आहे, पण पीडित कुटुंबियांना भेटायला वेळ नाही’, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -