घरदेश-विदेशशबरीमाला मंदिराचे दर्शन न घेता तृप्ती देसाई परतल्या

शबरीमाला मंदिराचे दर्शन न घेता तृप्ती देसाई परतल्या

Subscribe

शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याशिवाय आपण परत जाणार नाही असे तृप्ती देसाईंनी सांगितले होते. मात्र आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना दर्शन न घेताच परतावे लागले.

शबरीमाला मंदिर शुक्रवारी दोन महिन्यासाठी उघडण्यात आले. गुरुवारी रात्रीपासूनच शबरीमाला मंदिर परिसरामध्ये २२ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. केरळ्याच्या शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई कोची विमानतळावर पोहचल्या मात्र त्यांना मंदिराकडे जाण्यास विरोध करण्यात आला. विमानतळावर होणाऱ्या जोरदार विरोधामुळे अखेर तृप्ती देसाई पुण्याकडे परतल्या.

- Advertisement -

विमातळावरच जोरदार विरोध

शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी तृप्ती देसाई गेल्या मात्र त्यांना विमानतळावरच अडवण्यात आले. विमानतळाबाहेच आंदोलनकांनी तृप्ती देसाई यांना विरोध करत परत जाण्याचा इशारा दिला. विरोधामुळे जवळपास १२ तास तृप्ती देसाई यांना विमानतळावरच बसावे लागले. एका आंदोलकाने जर तृप्ती देसाी परत गेल्या नाही तर त्यांना आमच्या छातीवर पाय देऊन मंदिरात जावे लागेल असा इशारा दिला होता. कोची विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या टॅक्सी चालकांनी देखील तृप्ती देसाई यांना मंदिराकडे नेण्यास नकार दिला.

- Advertisement -

दर्शन न घेताच यावे लागले

भाजपचे नेते एम एम गोपी यांनी सांगितले की, तृप्ती देसाई यांना कोची विमानतळाच्या बाहेर पोलीस तसंच दुसऱ्या कोणत्याच सरकारी वाहनाचा वापर करुन दिला जाणार नाही. जर तृप्ती देसाई विमानतळाबाहेर आल्या तर त्यांच्याविरोधात सर्व रस्त्यावर आंदोलन केले जाईल असे आंदोलकांनी सांगितले होते. तसंच सकाळपासूनच कोची विमानतळावर ठिय्या देऊन बसल्या होत्या. शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याशिवाय आपण परत जाणार नाही असे तृप्ती देसाईंनी सांगितले होते. मात्र आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना दर्शन न घेताच परतावे लागले.

पत्रव्यवहार करुनही प्रतिसाद नाही

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र शबरीमाला मंदिर प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांनी मंदिरामध्ये महिला प्रवेशाला विरोध केला होता. मंदिरात महिलांना प्रवेश न दिल्यामुळे तृप्ती देसाई आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी १७ नोव्हेंबरला शबरीमाला मंदिरात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले होते. मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र केरळ सरकारकडून काहीच उत्तर आले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -