घरदेश-विदेशबलात्कारावर जनजागृती करणाऱ्या महिलांवर बलात्कार

बलात्कारावर जनजागृती करणाऱ्या महिलांवर बलात्कार

Subscribe

माणूसकीला काळीमा फासणारी झारखंड येथील घटना,या प्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी केले अटक

झारखंड राज्यातील खूंटी जिल्ह्यात पाच महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. पीडित महिला खाजगी सामाजिक संस्थेत कार्यरत असून बलात्कार आणि मानव तस्करी विरोधात जनगागृती करण्यासाठी गेल्या असता हा प्रकार घडला. या महिलांवर बलात्कार करताना त्याचे चित्रीकरणही करण्यात आले होते. पोलिसांकडे तक्रार केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्यांना देण्यात आली. मात्र आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार या महिलांनी खूंटी पोलिसांकडे केली. दरम्यान या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला असून तापस सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी बालात्काराच्या गुन्ह्या नोंदवला असून आठ जणांना अटक केली आहे.

कसा घडला प्रकार

‘आशा किरण’ या सामाजिक संस्थेत या महिला काम करत होत्या. या संस्थेने बलात्कार व मानवी तस्करी विरोधात पथनाट्य सादर करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमात ११ महिलांनी सहभाग घेतला होता. यामधील पाच महिलांचा गट खेडेगावात पथनाट्य सादर करण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात काही दूचाकी स्वारांनी अडवले. बंदूकीचा धाक दाखवून या महिलांना जंगलाच्या दिशेने नेले व त्यांच्यावर तीन तास बलात्कार केला. यामधील काही जणांनी मोबाईलमध्ये याचे चित्रीकरणही केले. आपले व्हिडिओ व्हायरल होतील या भितीने सुरुवातीला या महिलांनी तक्रार करण्याचे टाळले. मात्र यामधील एका महिलेनी झालेल्या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी पीडित महिलांची वैद्यकिय तापसणी केली. महिलांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपींना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -