घरदेश-विदेशकमल हासन जखमींना भेटले, मात्र आंदोलक संतापले

कमल हासन जखमींना भेटले, मात्र आंदोलक संतापले

Subscribe

चेन्नई – बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कमल हासन यांना राजकारणात आल्यानंतर पहिलाच दणका बसला आहे. काल तामिळनाडूच्या तुतिकोरीन येथील आंदोलनात हिंसाचार भडकला होता. यामध्ये ११ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाले होते. या आंदोलनात जखमी झालेल्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात गेलेल्या कमल हसन यांना पीडितांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांची भेट तर दूरच त्यांना फक्त पाहण्यासाठी जमणाऱ्या गर्दीतील लोकही त्यांना निघून जाण्यास सांगत होते.

तुतिकोरीन येथील स्टरलाइट या तांबेनिर्मिती प्रकल्पाविरोधात आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात अनेक जण जखमी झाले होते. काही जखमींना तुतिकोरीन येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमींची विचारपूस करण्यासाठी कमल हसन आज रुग्णालयात गेले. ते आल्यामुळे रुग्णालयात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यावर हसन यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक आणखीनच आक्रमक झाले. “तुम्ही आल्याने आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तुम्ही येथून निघून जा,” असे त्यांनी हसन यांना सांगितले.
“आंदोलक ग्रामस्थांवर गोळीबार करण्याचे आदेश कुणी दिले हे आम्हाला ठाऊक आहे. आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केवळ नुकसान भरपाई देऊन प्रश्न सुटणार नाही. नागरिकांच्या मागणीनुसार हा प्रकल्प बंद करण्यात यावा,” अशी मागणीही कमल हसन यांनी केली.

- Advertisement -
स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात आंदोलन

दरम्यान, तुतिकोरीन येथील सरकारी रुग्णालयाबाहेर पोलीस आणि ग्रामस्थ पुन्हा एकमेकांशी भिडले. त्यामुळे रुग्णालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

एक तरी ठार झाला पाहिजे
प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन तामिळनाडूत तुतिकोरिन येथे वेदांतच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरु झाले तेव्हा तेथून काही अंतरावर पोलिसांची एक गाडी उभी होती. यावेळी एक कर्मचारी गाडीच्या टपावर बंदूक घेऊन बसला होता. इतर पोलीस कर्मचारी खाली बुलेपप्रूफ जॅकेट घालून तर काहीजण खाकी वर्दीत उभे होते. काही वेळाने टपावर बसलेल्या त्या कर्मचाऱ्याने एखाद्या कमांडोप्रमाणे झोपून निशाणा साधला. याचवेळी मागून एक आवाज ऐकू येतो, “एक तरी ठार झाला पाहिजे”.

- Advertisement -

एएनआयने हा व्हिडीओ रिलीज केला आहे. यानंतर काही वेळातच गोळी झाडली जाते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -