कार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन

कार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन झाल्याची घटना घडली आहे.

Telangana
tv actresses bhargavi and anusha reddy died road accident in Telangana
कार अपघातात दोन अभिनेत्रींचे निधन

शूटींग संपवून घरी परतत असताना झालेल्या कार अपघातात दोन तेलगू अभिनेत्रींना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात भार्गवी (२०) आणि अनुशा रेड्डी (२१) या अभिनेत्रींचे निधन झाले आहे. भार्गवी आणि अनुशा या दोघी हैदराबादवरुन शूटींग संपवून घरी परतत होत्या. त्या दरमयान हा अपघात झाला आहे. भार्गवी आणि अनुशाच्या आगामी मालिकेतील काही दृश्यांचे अनंतगिरी येथील जंगलात चित्रीकरण करण्यात आले होते. हे चित्रीकरण आटोपल्यानंतर या दोघी कारमधून घरी जाण्यासाठी निघाल्या. याच दरम्यान विकाराबाद येथे त्यांच्यावर काळाने झडप घातली.

असा घडला अपघात

तेलंगणा येथील अनंतगिरी या ठिकाणी भार्गवी आणि अनुशा यांचे चित्रीकरण झाल्यानंतर त्या घरी परतत होत्या. दरम्यान, समोरुन भरधाव ट्रक आपल्या कारवर आदळला जात असल्याचे पाहून कार चालकाने अपघात टाळण्याच्या प्रयत्नात गाडीची दिशा वळवली. त्या दरम्यान कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार झाडाला जाऊन जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती कि त्या धडकेत कारच्या समोरील भागाचा चकाचुर झाला असून भार्गवी हिचा जागीच मृत्यू झाला. तर अनुशाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कारमधील अन्य दोघे जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. भार्गवी ही तेलगू टीव्ही मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने ‘मृत्याला मुग्गू’ या मालिकेत काम करत होती. यात तिचा निगेटीव्ह रोल होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुशा ही नवोदित अभिनेत्री होती. तसेच अनुशा ही तेलंगणाच्या जयशंकर भुपालापल्ली येथे राहणारी आहे. या दोन्ही अभिनेत्रींच्या निधनावर साऊथ इंडस्ट्रीने शोक व्यक्त केला आहे.