घरदेश-विदेशवीस महिन्याच्या धनिष्ठाने वाचवला पाच जणांचा जीव

वीस महिन्याच्या धनिष्ठाने वाचवला पाच जणांचा जीव

Subscribe

वीस महिन्याच्या धनिष्ठाने अवयव दान करत पाच जणांचा जीव वाचवला आहे. दिल्लीच्या रोहिणी परिसरातील धनिष्ठाने मृत्यूनंतर तब्बल ५ जणांचा जीव वाचवला आहे. वीस महिन्याच्या धनिष्ठाने मृत्यूनंतरही पाच जणांना नवं जीवन दिलं आहे. धनिष्ठाने पाच अवयव दान केले आहेत. दरम्यान, धनिष्ठा ही सर्वात कमी वयाची अवयव दान करणारी ठरली आहे.

दिल्लीतील रोहिणी भागात ८ जानेवारीला २० महिन्याची धनिष्ठा खेळत असताना पहिल्या मजल्यावरुन खाली पडली. त्यानंतर बेशुद्ध पडली. तात्काळ तिला सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु प्रयत्न निष्फळ ठरले. ११ जानेवारीला धनिष्ठाला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. मेंदू व्यतिरिक्त सर्व अवयव योग्य प्रकारे काम करत होते. त्यामुळे धनिष्ठाचे वडील आशिष कुमार आणि तिची आई बबिता या दोघांनी तिचे अवयव दान करण्याचं ठरवलं. धनिष्ठाचं हृदय, यकृत, दोन किडन्या आणि नेत्रपटल दान करण्यात आलं आहे. सर गंगाराम रुग्णालयात हे अवयव काढण्यात आले.

- Advertisement -

धनिष्ठाने मृत्यूनंतर पाच जणांना अवयव देऊन नवं जीवन दिलं आहे. एवढं दु:ख असतानाही आई-वडिलांच्या या निर्णयाने सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. धनिष्ठाचे वडील आशिष यांनी सांगितलं की रुग्णालयात असताना आम्हाला असे अनेक रुग्ण आढळले ज्यांना अवयवदानाची तीव्र गरज होती. आम्ही आमच्या धर्मिष्ठाला गमावलं आहे, परंतु आम्हाला वाटलं की अवयवदान केल्यानं केवळ तिचे अवयव रूग्णांमध्ये जिवंत राहू शकत नाहीत तर त्यांचे प्राण वाचविण्यात देखील मदत होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -