घरदेश-विदेशकोरोनाच्या धास्तीने गरोदर महिलेला ३ रुग्णालयाने दिला नकार; गर्भातच जुळ्यांचा मृत्यू

कोरोनाच्या धास्तीने गरोदर महिलेला ३ रुग्णालयाने दिला नकार; गर्भातच जुळ्यांचा मृत्यू

Subscribe

गरोदर महिलेला वेळेत उपचार मिळाले असते तर आज या महिलेच्या जुळ्या बाळांचा जीव वाचण्यास मदत झाली असती

देशभरासह राज्या-राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून बाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशापरिस्थितीत कोरोनाचा वाढणारा फैलावाने सगळ्यांच्या मनात धास्ती निर्माण केली आहे. दरम्यान केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भितीने गरोदर महिलेला तीन रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. तसेच वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने जुळ्या मुलांचा आईच्या गर्भातच मृत्यू झाला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

असा घडला प्रकार

केरळमध्ये २० वर्षीय शहाला ही महिला गरोदर होती. तिला प्रसृती कळा सुरू झाल्याने मंजरी मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. तिथे बेड नसल्या कारणाने रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही. त्यानंतर दोन रुग्णालयांनीही कोरोनाच्या भितीने तिला दाखल करून घेण्यास नकार दिला.  अखेर मंजिर रुग्णालयातच तिला दाखल करण्यात आले आणि तिची प्रसूती करण्यात आली. मात्र वेळेत उपचार मिळू न शकल्याने पोटातच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. शहाला आधी कोरोनाची लागण झाली होती. परंतु उपचारानंतर १५ सप्टेंबर रोजी तिचा रिपोर्ट निगेटिव्ह झाल्याचे कळाले. १८ सप्टेंबर रोजी डिलिव्हरीसाठी डॉक्टरांना संपर्क करण्यात आला.

- Advertisement -

जेव्हा मंजिली रुग्णालयात शहाला आणण्यात आले तेव्हा रुग्णालयाने निगेटिव्ह रिपोर्ट मानण्यास नकार दिला आणि दुसरी टेस्ट करण्यास सांगितले. पण शहालाकडे तितका वेळ नव्हता. रुग्णालयाने याबाबत हलगर्जीपणा केल्याच आरोप महिलेच्या पतीने केला आहे. तसेच, गरोदर महिलेला वेळेत उपचार मिळाले असते तर आज या महिलेच्या जुळ्या बाळांचा जीव वाचण्यास मदत झाली असती, असे देखील सांगितले जात आहे.


कोल्हापुरात रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग; २ रूग्णांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -