घरट्रेंडिंगtwitter वरील 'या' फिचरमध्ये होणार महत्वाचा बदल

twitter वरील ‘या’ फिचरमध्ये होणार महत्वाचा बदल

Subscribe

ट्विटरचे उपाध्यक्ष डेंटली डेव्हिस यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये ट्विटरमध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांविषयी माहिती दिली.

सोशल मीडियातील सर्वाधिक प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये ट्विट आणि रिट्विटच्या पर्यायात महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून छळवणूक विरोधी फीचर (Anti-Harassment Features) युजर्सच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ट्विटरचे उपाध्यक्ष डेंटली डेव्हिस यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये ट्विटरमध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांविषयी माहिती दिली.

ट्विटरमधील बदलांविषयी उपाध्यक्षांनी केले ट्विट

येणाऱ्या दिवसात ट्विटरमध्ये काही महत्त्वाचे बदल, नवीन फिचर्स युजर्सना पहायला मिळतील, असे सांगणारे ट्विट ट्विटरचे उपाध्यक्ष डेंटली डेव्हिस यांनी केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “२०२० मध्ये बदल करण्यात येणारे तसेच नवे फीचर्स आणायचा विचार ट्विटर करत आहे. त्या बदलांची यादी शेअर केली आहे.” यासाठी त्यांनी युजर्सकडून शिफारसी सुद्धा मागवल्या आहेत.

- Advertisement -

हे बदल होणार

ट्विटरवरील ट्विट आणि रिट्विटच्या फिचरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. युजरच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही त्यांच्या संवादाचा भाग बनता येणार नाही. त्याशिवाय इतर युजर्स ट्विट रिट्वीट करु शकतात किंवा नाही हे सुद्धा युजरला ठरवता येणार आहे. एवढेच नाही तर एका खास ट्विटला रिट्विट करण्याचा पर्यायदेखील बंद करण्याची सुविधा देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही कन्व्हर्सेशनमध्ये युजरच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांना सामील करु नये यासाठी देखील नवे फिचर आणण्याचा प्रयत्न ट्विटर करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -