अफगाणिस्तानमध्ये हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर; १५ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानामध्ये हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. हा अपघात दक्षिण हेलमंदमधील नवा जिल्ह्यात झाला. या भयानक अपघातात १५ जवानांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री झाला. जवानांना खाली उतरवून जखमी सैनिकांना घेवून जात असताना हा अपघात झाला.

अफगाणिस्तानाच्या टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, सैनिक नवा जिल्ह्यात झालेल्या कारवाईत जखमी झाले आणि त्यांना घेण्यासाठी आणि अतिरिक्त मदत देण्यासाठी हेलिकॉप्टर गेले होते. यावेळी भीषण अपघात झाला. या घटनेत १५ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या सैनिकांची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने अद्याप या घटनेबाबत कोणतंही विधान केलेलं नाही. प्रांताच्या राज्यपालांच्या प्रवक्त्या ओमर झ्वाक यांनी नावा जिल्ह्यातील घटनेची पुष्टी केली. त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मदत व बचाव कार्य वेगवान गतीने सुरू आहे. काही लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेलं जात आहे.


हेही वाचा – मोदी सरकारने जे हिसकावून घेतलं ते परत मिळवणार; मेहबुबा मुफ्ती यांचा इशारा