घरदेश-विदेशसुर्यकिरण विमान क्रॅश : एका वैमानिकाचा मृत्यू

सुर्यकिरण विमान क्रॅश : एका वैमानिकाचा मृत्यू

Subscribe

एअर शोच्या सरावादरम्यान दोन सूर्यकिरण विमानं एकमेकांवर आदळून हा अपघात झाला.

आज बंगळुरुमध्ये एअरशोच्या सरावादरम्यान दोन सुर्यकिरण विमानांची टक्कर होऊन अपघात झाला आहे. एअर शोचा सराव करत असताना ही दोन विमानं एमेकांवर आदळली आणि हा अपघात झाला. दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोन वैमानिकांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या अपघातात एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर २०११ मध्ये सूर्यकिरण विमानाच्या वायुदलातील वापरावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही दिवसांवर आलेल्या एअर शोमध्ये खास या विमानाचा सहभाग करण्यात आला होता. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या शोमध्ये वायुदलाच्या विमानांकडून विविध कसरती दाखवल्या जातात. याच कसरतीचा सराव बंगळुरुत सुरु होता, ज्यावेळी हा अपघात घडला.

सुदैवाने ज्या ठिकाणी हे विमान कोसळले आहे, त्याठीकाणी फार मोठी लोकवस्ती नसल्यामुळे मोठा घातपात टळला. दरम्यान, ज्या दोन वैमानिकांचे प्राण वाचले आहेत त्यांनी अपघातापूर्वी बचाव पॅरेशूटच्या साहाय्याने विमानाच्या बाहेर उडी मारली. तर मृत वैमानिकांचा क्रॅश दरम्यान झालेल्या स्फोटात दुर्देवी अंत झाला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -