नौशेरामध्ये दहशतवादी हल्ल्यात मेजरसह एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासात दहशतवाद्यांनी २ ठिकाणी जवानांवर हल्ला केला आहे. दरम्यान नौशेरा येथे झालेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर ३ जण जखमी झाले आहेत.

Jammu-Kashmir
jammu-kashmir terror attack
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांवर आयईडी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लष्कराच्या एका मेजरसह एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासामध्ये दहशतवाद्यांकडून केला गेलेला हा दुसरा हल्ला आहे.

सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून काही सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नाहीत. पाकिस्तानच्या या खुरापतींना भारतीय लष्कर उत्तर देण्यास तयार आहे. मात्र, पाकिस्तानला भारतासोबत करार करण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न केले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या लाल चौकजवळ सीआरपीएफच्या टीमवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

वर्षभरात २८८ दहशतवादी ठार

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये जवळपास २८८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र जम्मू-काश्मीरच्या घाटीमध्ये आता ३०० दहशतवादी सक्रिय आहेत. दहशतवाद्यांविरोधात अनेकदा काही भागात सर्च ऑपरेशन करण्यात आले. जवानांमुळे बऱ्याच ठिकाणी दहशतवाद्यांकडून सुरु असलेल्या कारवायांना लगाम लागला आहे. तर अनेक दहशतवादी कट जवानांनी उधळून लावले आहेत.

हेही वाचा – 

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या बसचा भीषण अपघात

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here