घरदेश-विदेशलग्नात जेवणावरून मेव्हण्यांमध्ये वाद; भांडण सोडवणाऱ्या पोलिसांनाच बसला मार

लग्नात जेवणावरून मेव्हण्यांमध्ये वाद; भांडण सोडवणाऱ्या पोलिसांनाच बसला मार

Subscribe

दोन्ही घरच्या मंडळींमध्ये नाराजीचे सुर उमटले आहेत.

लग्न म्हटले की मानपान आले. मानपानावरून ऐन लग्नात अनेकवेळा भांडणे होतात. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये एका लग्नात जोरदार भांडणे झाली. लग्न चालू असताना दोन मेव्हणे अचानक भांडू लागले. त्यांची भांडणे हाणामारी पर्यंत पोहचली. भर मांडवात झालेली भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिसांनाही यात बेदबम मारहाण करण्यात आली. पोलिसांना मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे लग्न समारंभाचा हिरमोड झाला. दोन्ही घरच्या मंडळींमध्ये नाराजीचे सुर उमटले आहेत.

उत्तर प्रदेशच्या गांधी पार्क येथील नौरंगाबाद जिल्ह्यात ही घटना घडली आहे. नौरंगाबाद येथील एका धर्मशाळेत सोमवारी लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. लग्नात हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस लग्न मंडपात पोहचले. दोन जावयांमध्ये झालेली भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच मारहाण करण्यात आली. मारहाणीची संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पोलिसांना मारहाण करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

लग्न समारंभसाठी दोन्ही घरचे व्हराडी मंडळी जमले होते. लग्न झाल्यानंतर जेवणाच्या पंगतीवरून दोन जावयांमध्ये वाद झाला. ते दोघे भांडू लागले. त्यांच्या वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. परंतु भांडणे सोडवायला गेलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना योग्य ती समज देण्यात आली आहे. या प्रकारमुळे दोन्ही घरातली मंडळी नाराज झाली आहेत.


हेही वाचा – Video: माणुसकीला कलंक! पोत्यामध्ये भरून ठेवलं जिवंत नवजात अर्भक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -