घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक

काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक

Subscribe

जम्मू - काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात जवानांना यश आले आहे.

देशभरात काही दिवसांपूर्वी श्रीलंकेमार्गे ६ दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीनंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना जम्मू – काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू – काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सुरक्षा दल, असे प्रयत्न हाणून पाडत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार; नाजनीन खोखर आणि खलील अहमद, अशी दहशतवाद्यांची नावे असून दोघांची कसून चौकशी सुरु आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार; दोन पाकिस्तानी दहशतवादी जम्मू – काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान त्यांना अटक करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच ३०० ते ३५० अतिरेकी काश्मिरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गुप्तचर एजन्सी आणि सुरक्षा दलाने म्हटले आहे. तर गेल्या दोन आठवड्यांत ४० ते ५० अतिरेकी घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीतील चार मजली इमारत कोसळून १ ठार; काहीजण अडकल्याची भिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -