भावानेच केली भावाची निघृण हत्या; कापलेले शीर घेऊन आरोपी पोलिसांत हजर

दोन भावांनीच चुलत भावांची हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे.

Nalgonda
two men murdered cousin
भावानेच केली भावाची निघृण हत्या; कापलेले शीर घेऊन आरोपी पोलिसांत हजर

तेलंगणात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ल्ह्यात दोन सख्या भावांनी मिळून त्यांच्या चुलत भावाची भर रस्त्यात हत्या केली आहे. नुसती हत्या करुन ते थांबले नाहीत तर त्यांनी त्याचे शीर धडापासून वेगळे करुन कापलेले शीर पोलिसांत घेऊन गेले आणि स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार भर गर्दीत घडला. मात्र पाहणाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. दोघी आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींचे नाव मोहम्मद गौस आणि इरफान असे आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

हत्या झालेल्या तरुणाचे नाव शेख सद्दाम असे आहे. शेख हा आरोपींचा चुलत भाऊ आहे. याशिवाय आरोपी मोहम्मद गौस आणि इरफान यांची बहिण रजिया हिला शेख सद्दामकडून दोन मुले झाली आहेत. त्यामुळे या मुलांचे संगोपन कर, असे मोहम्मद गौस आणि इरफानने त्याला सांगितले. यावर त्याने नकार दिला. त्यामुळे तिघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर शिवीगाळ आणि नंतर हाणामारीत झाले. याच वादातून दोन्हा भावांनी शेख सद्दामची निघृणपणे हत्या केली.


हेही वाचा – सोनभद्र हत्याकांडावरून राजकारण तापले; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात