पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे प्रचंड पाऊस पडत आहे.

Mumbai
two people death in cyclone bulbul
बुलबुल चक्रीवादळामुळे दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या सागर बेट आणि बांग्लादेश येथील खेपुपारा भागात मध्यरात्री बुलबुल चक्रीवादळ धडकले आहे. या वादळामुळे परिसरात प्रचंड पाऊस पडत आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय वादळामुळे मोठी वित्तहानी देखील झाली आहे. हे वादळ पुढील १२ तासांत आणखी भयानक रुप धारण करणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हे वादळ ताशी १२० किमीच्या वेगाने ओडिशा, पश्चिम बंगालकडून बांग्लादेशच्या दिशेने धावत आहेत.


हेही वाचा – ‘महा’ वादळापाठोपाठ ‘बुलबुल’ चक्रीवादळ, महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा


 

कोलकाता विमानतळ १२ तासांसाठी बंद

बुलबुल वादळाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळ १२ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवरील तब्बल एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या हवामानामुळे राज्याचे आर्थिक नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर दळवळ सेवा देखील ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here