घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चकमक; जैशच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चकमक; जैशच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

चकमकीत ठार करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. चकमकीत लष्कराचे ४ जवान जखमी झाले आहेत यामधील एका जवानाची प्रकृती गंभीर आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील परगाम भागामध्ये ही चकमक सुरु आहे. परगाममध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसले आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणअयात जवानांना यश आले आहे. या चकमकीत लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत. सध्या चकमक सुरुच आहे.

- Advertisement -

चकमकीत ४ जवान जखमी 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जवानांना बजगाम भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू पोलिसांनी संयुक्त कारवाई करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला घेराव घातला. जवानांना पाहून लपून बसलेले दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. रहिवाशी परिसर असल्यामुळे जवानांना अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे. दरम्यान, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आतापर्यंत जवानांना यश मिळाले आहे. ठार करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. चकमकीत लष्कराचे ४ जवान जखमी झाले आहेत यामधील एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळावरुन मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

तीन महिन्यात ६० दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या २४ तासामधली ही तिसरी चकमक आहे. याआधी गुरुवारी शोपियां आणि हंदवाडा येथे चकमक झाली होती. या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या आठवडाभरात १२ दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. गेल्या तीन महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराकडून ऑपरेशन ऑल आऊट सुरु आहे. यावर्षी मार्चपर्यंत ६० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात जास्त जैश-ए-मोहम्मदच्या २२ दहशतवादी आहे. या व्यतिरिक्त हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे १५ आणि लष्कर-ए-तोएबाचे १४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तर मागच्यावर्षी २५० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

हेही वाचा – 

शोपियांमध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -