जम्मू-काश्मीर: सुरक्षा दल-अतिरेक्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर: सुरक्षा दल-अतिरेक्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

जम्मू- काश्मीरमधील शोपिअन जिल्ह्यातील सुगान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. अद्याप या भागात ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान सुरक्षा दलाच्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर ही चकमक सुरू झाली.

 

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होत आहे. तसेच दहशतवाद्यांचे होणार हल्ले सध्या वाढत आहे. घाटी भागात अनेक दहशवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले आहे.

यापूर्वी सोमवारी ५ ऑक्टोबरला दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये दोन जवान शहीद झाले असून तीन जखमी झाले होते. तसेच याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना समोर आली होती. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) शहीद झाले. तसेच त्यावेळेस पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले.


हेही वाचा – Hathras Gangrape Case: आरोपी-पीडितेच्या भावात १०० वेळा कॉल; पोलीस पेचात