पुलवामामध्ये चकमक; जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे शहीद अहमद बाबा आणि अनियत अहमद जिगर अशी आहेत. हे दोन्ही दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे.

Jammu-Kashmir
encounter with security forces in Rajpora
छत्तीसगडमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरच्या पुलवामातील राजपोरा भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे शहीद अहमद बाबा आणि अनियत अहमद जिगर अशी आहेत. हे दोन्ही दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी एक एसएलआर आणि एक बंदुक जप्त केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसात दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या दोन जवानांसह १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जवानांकडून ठिकठिकाणी कॉबिंग ऑपरेशन केले जात आहे.

अशी झाली चकमक

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले वाढले आहेत. पुलवामाच्या राजपोरा भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

२४ तासात दोन वेळा हल्ला

दहशतवाद्यांनी गुरुवारी शेरबाग अनंतनाग भागातील शेरबाग पोलीस चौकीच्या बाहे उभ्या असलेल्या सीआरपीएफ जवानांना लक्ष्य करत ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांसह ८ जण जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दहशवाद्यांना घटनास्थळावरुन पळून जाण्यात यश आले. गेल्या २४ तासामध्ये दक्षिण काश्मीरमध्या जवानांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. याआधी बुधवारी दहशतवाद्यांनी दम्हाल हांजीपोरा कुलगाममध्ये पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात ४ जण जखमी झाले.