उबरचा ११ टक्के व्यावसाय भारतीयांकडून

उबर कंपनीचा ११ टक्के व्यवसाय भारतीय ग्राहकांकडून येत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. उबर इंडियाचे प्रमूख प्रदीप परमेस्वरन यांनी दिली आहे.

New Delhi
uber
प्रातिनिधिक फोटो

जगभरात परसलेल्या टॅक्सी सेवेतील आघाडीची कंपनी उबर ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जगातील एकूण युजर्स पैकी ११ टक्के भारतीय उबरला व्यवसाय देतात. उबर इंडियाचे प्रमूख प्रदीप परमेस्वरन यांनी ही माहिती दिली आहे. उबर इंडियाकडून तिमाहित १.६४ अब्ज डॉलर्स (११ हजार ६५१ कोटी रुपयांचा) चा व्यवसाय उबरला मिळाला आहे. उबरसाठी भारतीय बाजारपेठ ही मोठी आहे. यानंतर चीन, रशीया आणि दक्षिण एशियातील आठ देशांचा क्रमांक लागतो. भारतामध्ये उबर युजर्सची संख्या वाढत आहे. ऑनलाइन पद्धतीने टॅक्सी बुक करून प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात भारतात असल्याने भारतातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याचे उबरने सांगितले आहे. प्रदीप परमेस्वरन यांनी मागील वर्षातील जानेवारी महिन्यात उबर कंपनीचा पदभार संभाळला होता. यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी कंपनीचा अहवाल शेअर करण्यात येत आहे.

येत्या काळात वाढणार व्यवसाय

उबर इंडियामध्ये युजर्सची संख्या वाढली आहे. मागील वर्षात १.५ दशलक्ष नवीन युजर्स उबरला जोडले गेले आहेत. यामध्ये दक्षिण भारतातील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रवासाबरोबरच उबर फुड अॅपही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे घरबसल्याच अनेक युजर्स जेवणाची ऑर्डर या अॅपद्वारे देतात. येत्याकाळात उबर भारतात चांगला व्यवसाय करेल असे मत प्रदीप परमेस्वरन यांनी मांडले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here