दिल्लीत भाजपला धक्का; खासदार उदित राज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Delhi
udit raj join congress
उदित राज यांनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

दिल्लीमध्ये भाजपला धक्का बसला आहे. दिल्लीतील भाजपचे विद्यमान खासदार उदित राज यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसच्या हातात हात दिला आहे. दिल्लीतर उत्तर पश्चिम मतदारसंघातून भाजपने गायक हंसराज याला उमेदवारी दिली. त्यामुळे उदित राज हे नाराज झाले होते. आज त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हसंराज याला तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या उदीत राज यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील चौकदार हा शब्द हटवला. मात्र सायंकाळी ४ वाजता त्यांनी परत चौकीदार हा शब्द टाकला. त्यामुळे भाजपने त्यांची समजुत काढली असे बोलले जात होते. मात्र आज सकाळी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज सकाळी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मागच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघातून उदित राज यांना भाजपने २०१४ ला तिकीट दिले होती. ते या मतदार संघामधून खासदार म्हणून सुध्दा निवडणून आले. मात्र यावेळी त्यांची तिकीट कापण्यात आली. त्यामुळे त्यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी मंगळवारी सांगितले होते की, भाजप मला पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकत आहे.

पक्षाकडून तिकीट कापण्यात आल्याच्या प्रश्नावर उदित राज यांनी उत्तर दिले की, २०१८ मध्ये दलितांसाठी आवाज उठवल्यामुळे पक्ष नाराज झाला असावा. जर सरकारकडून नोकर भरती होत असेल त्यासाठी आवाज उठवणे चूक आहे का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर दलितांसाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. उदित राज हे दलित समाजाचे नेते आहेत. भाजपाने मला तिकीट नाकारुन अन्याय केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.