घरताज्या घडामोडीअरेच्चा! लग्नानंतर समजले वधू 'ती' नसून 'तो' आहे!

अरेच्चा! लग्नानंतर समजले वधू ‘ती’ नसून ‘तो’ आहे!

Subscribe

युगांडात राहणाऱ्या एका तरुणाला लग्नानंतर समजले की आपली पत्नी स्त्री नसून पुरुष आहे.

युगांडात राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या तरुणाला लग्नानंतर दोन आठवड्यातच धक्का बसला आहे. या तरुणाला नुकतेच समजले की, आपण ज्या तरुणीशी विवाह केला आहे. ती महिला नसून पुरुष आहे. विशेष म्हणजे या घटनेचा खुलासा शेजाऱ्याने केलेल्या आरोपानंतर समोर आला आहे. शेख मोहम्मद मटुंबा, असे या तरुणाचे नाव असून त्यांनी एका महिले समोर डिसेंबरमध्ये लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर त्या दोघांचे लग्न झाले. मात्र, दोन आठवड्यानंतर आपली बायको स्त्री नसून पुरुष असल्याचे कळताच शेख मोहम्मद मटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.

नेमके काय घडले?

युगांडातील एका २७ वर्षाच्या तरुणाने नबुकिरा या तरुणीशी विवाह केला होता. लग्नानंतर दोघेही आनंदाने राहत होते. मात्र, एक दिवस नबुकिरा हिला त्यांच्याच घरातील टीव्ही आणि कपडे चोरताना मटुंबाच्या शेजाऱ्यांनी पाहिले. त्याचवेळी त्यांना तिच्यावर संशय आला आणि त्यांनी पोलिसात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला पोलिसांनी तिची झडती घेतली. या झडती दरम्यान त्यांना धक्काच बसला. कारण ती स्त्री नसून पुरुष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत मटुंबाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ‘लग्न होऊन दोन आठवडे झाले. मात्र, माझी बायको सतत माझ्यापासून दूर राहत होती. तसेच तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी तिने पीरियड्स असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे मलाही ते कारण पटले होते’.

- Advertisement -

दरम्यान, नबुकिरा ही स्त्री नसून पुरुष आहे. तसेच त्याचे खरे नाव रिचर्ड असे आहे. त्यांनी पैसा हडपण्यासाठी शेख मोहम्मद मटुंबाशी विवाह केल्याचा सांगितले आहे.


हेही वाचा – …आणि नेटिझन्सला आली धोनीची आठवण! भन्नाट ट्वीट्स व्हायरल!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -