घरदेश-विदेशदुकानातून कुत्रे आणि मांजरींच्या पिल्लांना विकत घेण्यास ब्रिटनमध्ये बंदी

दुकानातून कुत्रे आणि मांजरींच्या पिल्लांना विकत घेण्यास ब्रिटनमध्ये बंदी

Subscribe

कुत्रे आणि मांजरींना दुकानातून विकत घेण्यास ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे अनेक प्राणि प्रेमींनी स्वागत केले आहे. यामुळे प्राण्यांची होणारी तस्करी बंद होणार असल्याचे सांगितले जाते.

प्राणी प्रेमींसाठी ब्रिटनमध्ये एका नवीन कायद्याची सुरवात करण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत आता दुकानातून कुत्रे किंवा माजरीचे पिल्ले विकत घेऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. आता नागरिक प्राणी पाळणाऱ्या व्यक्तीकडून परस्परच ही पिल्ले विकत घेऊ शकणार आहे. या नियमाचे अनेक प्राणी संघटनांनी स्वागत केले आहे. प्राण्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ब्रिटनच्या सरकारने सांगितले आहे. प्राण्यांचे सरक्षण व्हावा यासाठी हा नियम बनवण्यात आला असल्याचे पशु कल्याणमंत्री डेव्हिड रुटले यांनी सांगितले आहे.

“घेतलेला नियम हा आमच्या आश्वासनाचाच एक भाग आहे. प्राण्यांच्या सुरक्षेवर आम्ही ब्रिटनच्या जनतेला अनेक आश्वासने दिली होती ती आज पूर्ण करत आहोत. यामुळे प्राण्यांची होणारी तस्करीवर नियंत्रण ठेवण्यात मदत होणार आहे.”  – पशु कल्याणमंत्री डेव्हिड रुटले

- Advertisement -

काय आहे नवीन नियम

नवीन नियमाअंतरगर्त ज्यांना कुत्रा आणि मांजरीच्या पिल्लांना पाळण्यासाठी विकत घ्यायचे असल्यास त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पिल्लं पाळणाऱ्या व्यक्तीकडूनच फक्त पिल्ल विकत घेऊ शकतो असे कायद्यात सांगितले आहे. हा कायदा लंडनपासून १४५ मैल (२३५ किलोमीटर) दूर असलेल्या ट्रन्थम शहरात लागू करण्यात आला आहे. येत्या काळाता संपूर्ण ब्रिटनमध्ये हा कायदा लागू होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -