घरट्रेंडिंगविजय माल्ल्या भारतात येणार; लंडन कोर्टाची मंजुरी

विजय माल्ल्या भारतात येणार; लंडन कोर्टाची मंजुरी

Subscribe

दरम्यान, विजय मल्ल्या लंडन कोर्टाच्या या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ शकतो.

भारतात कोट्यावधींचा घोटाळा करुन पळालेल्या विजय माल्ल्याला भारताच्या हवाली करायचं की नाही? यावर इंग्लंडच्या न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती. संपूर्ण देशाचं लक्ष या निर्णयाकडे लागून राहिलं असतानाच, लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी देण्यात आली आहे. लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात आज प्रत्यार्पणावर सुनावणी झाली. आज न्यायालयात जाण्याआगोदर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माल्ल्या म्हणाला होता की. ‘आधीही मी बँकांचं कर्ज फेडण्यासंबंधी बोललो होतो. त्यामुळे कर्ज फेडण्याच्या माझ्या त्या वक्तव्याचा माझ्या प्रत्यार्पणाशी काहीच संबंध नाही.’ कर्ज फेडण्यासाठी मी दाखवलेली तयारी ही बनावट नव्हती, असंही तो यावेळी म्हणाला होता. याआधी विजय माल्ल्याने ‘मी १०० टक्के कर्ज फेडायला तयार आहे पण मी केवळ मुद्दलीची रक्कम परत देऊ शकतो, व्याजाची रक्कम देऊ शकत नाही’, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, माल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी लंडन कोर्टाने परवानगी दिली असली, तरी मल्ल्या या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊ शकतो.

२०१६ साली भारतीय बँकांचे ९ हजार कोटी बुडवून विजय माल्ल्या परदेशी फरार झाला होता. त्याच्या प्रत्यापर्णसाठी भारत नेहमीच प्रयत्नशील होता. माल्ल्याला भारतात आणण्यासाठी आता भारतीय बँकांनी इंग्लंडच्या न्यायालयामध्ये धाव घेतली होती. भारतीय मीडियानं मला पोस्टर बॉय बनवले अशा शब्दात विजय माल्ल्यानं भारतातील प्रसार माध्यमांना धारेवरही धरलं होतं. विजय माल्ल्याला भारतात आणण्यासाठी भारतीय यंत्रणा पूर्णपणे कार्यरत होती. भारतात आणल्यानंतर माल्ल्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्याच्या जेलमधील खोलीचा व्हिडीओ देखील मुंबई पोलिसांनी लंडनमधील न्यायालयामध्ये सादर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -