घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटब्रिटन: करोनामुळे भारतीयांसह इतर परदेशी नागरिकांच्या व्हिसाला मुदतवाढ

ब्रिटन: करोनामुळे भारतीयांसह इतर परदेशी नागरिकांच्या व्हिसाला मुदतवाढ

Subscribe

करोना व्हायरस सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी ब्रिटनने भारतीयांसह इतर परदेशी नागरिकांच्या कालबाह्य किंवा कालबाह्या झालेल्या व्हिसाची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहे. जे नागरिक ३१ मे पर्यंत करोना व्हायरसमुळे घरी परतू शकणार नाही त्याकरिता ही मुदतवाढ करण्यात येणार आहे. सध्या ब्रिटनमध्ये प्रवासासंदर्भात कडक निर्बंध लागू केले असून सुद्धा पकडलेल्या कुणावरही कारवाई केला जाणार असल्याचे गृहसचिव प्रिती पटेल यांनी म्हटलं आहे. तसंच काही विशिष्ट प्रवर्गांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांनासहित भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमधून तात्पुरती व्हिसा बदलण्याची मुभा दिली असून त्यांनी नेहमीच्या नियमानुसार अर्ज भरण्यास सांगितले आहे.

ब्रिटनने प्रथम लोकांच्या आरोग्य आणि कल्याणावर भर दिला आहे. अशा नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीत कोणालाही शिक्षा केली जाणार नाही, असं भारतीय वंशाचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणाले. नागरिकांच्या व्हिसामध्ये मुदत वाढवून आम्ही नागरिकांना मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यास मदत करत आहोत. अत्यावश्यक सेवत काम करत असलेले नागरिक काम सुरू ठेवू शकतात, असं गृहसचिव म्हणाल्या.

- Advertisement -

२४ जानेवारीनंतर ज्यांची रजाची मुदत संपली आहे. मात्र ते प्रवासासंदर्भात घातलेल्या निर्बंधामुळे किंवा सेल्फ आयसोलेशनमुळे देश सोडू शकले नाहीत अशा नागरिकांना ही व्हिसा मुदतवाढ लागू होईल. असं पहिल्यांद घडतं आहे, ३१ मेपर्यंत मुदतवाढ केली आहे, गृह कार्यालयाने सांगितलं.

व्हिसासाठी गृह कार्यालयात संपर्क साधणाऱ्यांनी प्रवासासंदर्भातील निर्बंध मागे घेतल्यानंतर लवकरात लवकर आपल्या मायदेशी परत येण्याची अपेक्षा केली जाईल. गृह ऑफिसला ई-मेल करणाऱ्यांसाठी कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

आतापर्यंत ब्रिटनमध्ये ८ हजार ७७ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३५ जण करोना व्हायरस फ्री झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus : इराणमध्ये अडकलेले २७७ भारतीय विशेष विमानाने परतले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -