घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेट'कमी खा, जीव वाचवा', कोरोनापासून वाचण्यासाठी ब्रिटनचा सल्ला

‘कमी खा, जीव वाचवा’, कोरोनापासून वाचण्यासाठी ब्रिटनचा सल्ला

Subscribe

कोरोना व्हायरसने अवघ्या विश्वाचा ताबा घेतल्यानंतर आता सर्वच देश कोरोनामुळे होणारे मृत्यू कसे रोखता येतील, याचा प्रयत्न करत आहेत. अनेक देशांनी लसींवर काम करायला सुरुवात केली आहे, तर काही देशांनी लोकांना कोरोनापासून वाचिवण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टसिंग अशा नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र ब्रिटनने आपल्या देशातील नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. ब्रिटनच्या ज्यूनिअर आरोग्य मंत्री हेलेन वेटली यांनी लोकांना कमी खान्याचा आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

जगभरात कोरोनामुळे जे मृत्यू होत आहेत, त्यात प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले, आधीपासून गंभीर आजार असलेले आणि स्थूलपणा असलेले व्यक्ती कोरोनाचे बळी ठरत आहेत. या आधारावरच हेलेन वेटली म्हणाल्या की, “स्थूलपणामुळे कोरोना व्हायरसचा धोका अधिका वाढतो. यासाठी लोकांनी कमी खायला हवे आणि वजन कमी करण्याकडे त्यांचा कल हवा. तसेच ४० हून अधिक बॉडी मास्क इंडेक्स (BMI) असणाऱ्यांनाही कोरोनाचा अधिक धोका असतो.”

- Advertisement -

ब्रिटन सरकारने नागरिकांचा स्थूलपणा घालविण्यासाठी उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. जंक फूडच्या जाहीरातींवर बंदी घालण्यात आलेली आहे. ब्रिटनच्या आरोग्या आणि सामाजिक कल्याण विभागाने सोमवारी निर्देश जारी केले की, रात्री ९ च्या आधी टीव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अधिक फॅट असलेले पदार्थ, साखर आणि मीठ असणाऱ्या जंक फुडची जाहीरात करता येणार नाही. एवढेच नाही तर आरोग्यास हीतकारक नसलेल्या पदार्थांवरील एकावर एक फ्री सारख्या ऑफरही बंद करण्याचा विचार सरकार पातळीवर सुरु आहे. तसेच दुकाने आणि रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक पदार्थावर कॅलरी लेबल लावण्याची गरज असल्याचा विचार केला जात आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचे ६ किलो वजन कमी केले होते. आरोग्य क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, अधिक वजन असलेल्यांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका अधिक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -