घरCORONA UPDATEब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून Coroan Vaccine देण्यास सुरूवात; भारतासाठी ठरली ही खुशखबर

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून Coroan Vaccine देण्यास सुरूवात; भारतासाठी ठरली ही खुशखबर

Subscribe

कोरोना विषाणूवरील लसीची संपूर्ण जगभरात आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ब्रिटिश मीडियाच्या एका रिपोर्टनुसार लंडनमधील नामवंत हॉस्पिटलला कोरोनाची लस घेण्याकरता तयारी करण्यास सांगितले आहे. या हॉस्पिटलला ऑक्सफर्ड लसीची पहिली बॅच दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार २ नोव्हेंबर रोजी ही लस रोलआऊट केली जाण्याची शक्यता आहे. दि सन या वृत्तपत्राने हा दावा केला आहे की, युकेतील नॅशनल हेल्थ सर्विसेस यासंबंधी सर्व योजना आखली आहे.

याकरता भारतासाठी ठरली गुड न्यूज 

सध्या ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेल्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. जर २ नोव्हेंबरपासून युकेतील लस रोलाऊट झाली तर भारतासाठी ही मोठी खुशखबर ठरणार आहे. एस्ट्राजेनेकाच्या या लसीचे १०० कोटींचे डोज भारतातील सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया (SII) कंपनीमार्फत बनवले जात आहेत. SII ही जगभरातील सर्वात मोठी लसनिर्मितीसाठी ओळखली जाणारी कंपनी. या अहवालात दावा करण्यात आला आहे की युकेतील हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत. सर्व संशोधक आता डॉक्टर्स, नर्सेज आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्याच्या तयारीत आहेत. तसेच ही लस तेव्हाच डिप्लॉय केली जाईल जेव्हा त्याच्या चाचण्या सुरक्षित आणि परिणामकारक होतील, असेही यात नमूद करण्यात आले आहे. त्याला स्वतंत्र रेग्युलेटरचीदेखील मंजूरी आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

नरभक्षी दांपत्याचं भीषण कृत्य! रोज खायचे मानवी मांसापासून बनवलेलं लोणचं आणि बिस्किट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -