घरअर्थजगतयूकेच्या सरकारने सादर केलं जगातील पहिलं सोन्याचं ATM कार्ड

यूकेच्या सरकारने सादर केलं जगातील पहिलं सोन्याचं ATM कार्ड

Subscribe

गोल्ड कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे ते १८ कॅरेट सोन्याचे बनलेले असून त्याचे मूल्य १८ हजार ७५० युरो म्हणजेच १४ लाख ७० हजार रुपये आहे

आतापर्यंत तुम्ही अनेक सोन्याचे दागिने पाहिले असतील. प्रत्येकाने सोन्याच्या शूज आणि कपड्यांविषयी ऐकले असेलच. परंतु तुम्ही सोन्याच्या एटीएम कार्ड बद्दल पहिल्यांदाच ऐकत असाल. ब्रिटीश सरकारच्या मालकीची कंपनी ‘द रॉयल मिंट’ ने जगातील पहिलं सोन्याचं एटीएम कार्ड (solid gold debit cards) तयार केले आहे, ज्याची किंमत लाखो आहे. कंपनीने या कार्डचे नाव ‘रेरीस’ (Raris) ठेवले आहे.

- Advertisement -

लक्झरी पेमेंट कार्डची ही आहे किंमत

या गोल्ड कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे ते १८ कॅरेट सोन्याचे बनलेले असून त्याचे मूल्य १८ हजार ७५० युरो म्हणजेच १४ लाख ७० हजार रुपये इतके आहे. त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे त्याची गणना लक्झरी पेमेंट कार्डच्या श्रेणीमध्ये केली गेली आहे.

- Advertisement -

हे आहेत सोन्याच्या ATM कार्डचे वैशिष्ट्य

  • या डेबिट कार्डमध्ये ग्राहकाचे नाव आणि स्वाक्षरी असेल, जे ते खरेदी करण्यासाठी अधिक लोकांना आकर्षित करतात.
  • या गोल्ड कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • ग्राहक या कार्डचा वापर विविध प्रकारे करू शकतो. त्यासाठी ग्राहकांना कोणतेही परकीय चलन शुल्क भरावे लागणार नाही.

मर्यादित ग्राहकांना मिळेल हे सोन्याचे कार्ड

हे लक्झरी पेमेंट कार्ड किती लोकांना दिले जाईल याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु एका दाव्यानुसार ते केवळ मर्यादित ग्राहकांनाच उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -