Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द 

ब्रिटनमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला.

Related Story

- Advertisement -

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु, ब्रिटनमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. ‘बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या महिन्यात जॉन्सन भारताच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु, ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर होत असल्याने त्यांनी दौरा रद्द केला आहे. दौरा रद्द करावा लागल्याची खंत जॉन्सन यांनी मोदी यांनी बोलून दाखवली,’ असे डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोरिस जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आले होते. कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्याने काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान म्हणून जॉन्सन यांना ब्रिटनमध्ये थांबणे आवश्यक वाटले, असेही डाऊनिंग स्ट्रीटचे प्रवक्ते म्हणाले.

- Advertisement -

ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. डिसेंबरच्या अखेरीस एकाच दिवशी ८० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सोमवारी रात्री जॉन्सन यांच्या सरकारने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली. हे लॉकडाऊन फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनाची ही गंभीर परिस्थिती पाहूनच पंतप्रधान जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केला आहे.

- Advertisement -