घरCORONA UPDATECoronavirus: ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन रुग्णालयात दाखल

Coronavirus: ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन रुग्णालयात दाखल

Subscribe

अद्याप कोरोना विषाणूची लक्षणं असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आता कोरोनाच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. पंतप्रधान जॉनसन यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. पंतप्रधान जॉन्सनचा अहवाल गेल्या महिन्यात पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला १०, डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानी क्वारंटाईन करुन घेतलं होतं. १० दिवस होऊन गेले तरी देखील लक्षणं दिसत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोना विषाणू ब्रिटनमधील राजघराण्यापर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधान जॉन्सनपूर्वी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: तबलीगमुळे ७ ऐवजी ४ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट; केंद्र सरकारचा दावा


दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, “गेल्या २४ तासांत मला सौम्य लक्षणे आढळून आली आहेत आणि कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता मी स्वत: ला वेगळे करत आहे. परंतु आम्ही कोरोनाविरूद्ध लढा देत आहोत, त्यावेळी मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारचे नेतृत्व करत राहीन.”

- Advertisement -

डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले की, सौम्य लक्षणं दिसून आल्यानंतर पंतप्रधानांचे मुख्य चिकित्सक प्रोफेसर ख्रिस व्हेटीच्या सल्ल्यानुसार कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या कर्मचार्‍यांनी जॉनसनची १०, डाऊनिंग स्ट्रीटवर चाचणी केली आणि चाचणी पॉझिटिव्ह आली. प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान डाऊनिंग स्ट्रीटमध्ये क्वारंटाईन आहेत. कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात ते सरकारचे नेतृत्व करत राहतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -