घरताज्या घडामोडीअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला भारतीय तपास यंत्रणांच्या मदतीने पश्चिम आफ्रिकेच्या सेनेगल इथे अटक करण्यात आली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला भारतीय तपास यंत्रणांच्या मदतीने पश्चिम आफ्रिकेच्या सेनेगल इथे अटक करण्यात आली आहे. गुन्हेगार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम सेनेगलमध्ये तैनात आहे. त्याशिवाय त्यांच्या मदतीसाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ चे अधिकारीही त्यांच्यासोबत आहेत. जेव्हा रवी पुजारी शेवटचा पळाला होता तेव्हा तो सेनेगल येथून पळाला होता अशी माहिती समोर आली आहे. इकोनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

रवी पुजारीला भारतात आणार

रवी पुजारीला आज भारतात आणण्याचे सर्व कागदपत्र पूर्ण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आज त्याला भारतात आणण्यात येईल अशी माहिती देखील समोर आली आहे. तसेच ज्यावेळी रवी पुजारीला भारतात आणले जाईल त्यावेळी त्याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नांडिसच्या नावाने पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट १० जुलै २०१३ रोजी जारी करण्यात आला होता, जो ८ जुलै २०२३ पर्यंत वैध आहे. पासपोर्टनुसार, तो एक व्यावसायिक एजंट त्याला व्यावसायिक म्हणून ओळखले जात आहे. जो सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये ‘नमस्ते इंडिया’ नावाच्या रेस्टॉरंट्स चालवतो. भारतीय गुप्तचर संस्था रॉ सध्या रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

कोण आहे हा रवी पुजारी?

रवी पुजारी याने बॉलिवूड स्टार आणि अगदी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना हद्दपार करण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरुद्ध कर्नाटक आणि मुंबई इथे ९८ खटले प्रलबिंत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणींनी रवी पुजारी विरोधात तक्रार दाखल केली होती. रवी पुजारीने आपणांस जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते.

- Advertisement -

जिग्नेश मेवाणी म्हणाले की, त्यांना रवी फोन कॉल्स आणि मेजेस करुन धमकावत होता. विशेष म्हणजे तो आपण रवी पुजारी बोलत असून मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे, असे देखील त्याने म्हटले होते. तसेच गोळ्या घालेन अशी देखील धमकी दिली होती.


हेही वाचा – दोषी विनय शर्माची वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भातील याचिका फेटाळली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -