मोबाईल हाताळता येत नसल्यामुळे नवऱ्याने केला बायकोचा खून!

Pune man, friend brutally murder his wife's social media buddy; arrested

एका पदवीधर असलेल्या व्यक्तीचे एका अशिक्षित महिलेशी लग्न झाले होते. तेव्हापासून तो खूप नाराज होता. त्याच्या बायकोला साधा मोबाईल सुद्धा हाताळता येत नव्हता. त्यामुळे नवऱ्याने अशिक्षित बायकोपासून सुटका करण्यासाठी क्राईम पेट्रोल या मालिकेतून तिचा खून करण्याची आयडिया घेतली आणि त्याने पायाने तिचा गळा दाबून खून केला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील आहे.

बस्तीच्या वाल्टरगंज पोलीस ठाण्याच्या कृपालपूर गावाजवळ कुआनो नदीमध्ये पोत्यात या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला. निर्घृणपणे ठार मारलेल्या या २५ वर्षीय मृत शोभावतीचा दोष इतका होता की, ‘ती अशिक्षित होती आणि तिला मोबाईल हाताळता येत नव्हता.’

खून करणाऱ्या आरोपी नवऱ्याने अग्रीकल्चरमध्ये बीएससीपर्यंत शिक्षण घेतले होते. लग्नानंतर बायकोमुळे नाखूष असलेला नवरा श्रीशंकरने अनेक वेळा तिला सोडण्याचा प्रयत्न केला. पण ती नवऱ्यासोबत सासरी राहू इच्छित होती. मग आरोपी नवऱ्याने तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तिच्या खूनाचा कट रचला.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, ६ सप्टेंबरला सकाळी नवऱ्याने पायाने गळा दाबून तिचा खून केला. या खूनाची माहिती चुलत भाऊ उमाशंकर यादव आणि चुलत सासू प्रेमशीला यांना होती. या दोघांच्या मदतीने त्याच रात्री मृतदेह पोत्यात भरून बाईकवरून श्रीशंकर गटरापूलवर पोहोचला आणि ते पोते कुआनो नदीत फेकून दिले. पोलिसांना मृतदेह आढळल्यानंतर शोभावतीचा भाऊ राकेश कुमार यांनी तक्रार दाखल केली.

पोलीस चौकशीत आरोपी नवऱ्याने सांगितले की, ‘तो अनेकदा मोबाईल फोनवर क्राईम पेट्रोल बघत होता. त्याने तिचा हाताने गळा दाबण्याऐवजी पायाने गळा दाबला आणि इतर नाजूक ठिकाणी त्याने वार केलs. यानंतर मृतदेह पोत्यात भरला आणि तो नदीत फेकून दिला.’


हेही वाचा – धक्कादायक! एकच मोबाईल आणि तीन भावंड; अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बहिणीची आत्महत्या