सहा महिन्यात तिहेरी तलाक कायद्यात बदल होणार

आता केंद्र सरकार पुढील सहा महिन्यात तिहेरी तलाक संदर्भातील कायद्यामध्ये बदल करणार आहे. कायद्यात बदल करताना मुस्लिम संघटना आणि शरीयातील नियमांचा विचार देखील केला जाणार आहे.

New Delhi
Triple talaq bill in lok sabha
तिहेरी तलाक विधेयक (प्रातिनिधिक छायाचित्र)

तीन वेळा ‘तलाक’ हा शब्द उच्चारल्यानंतर मुस्लिम धर्मात तलाक होतो. या प्रथेविरोधात मुस्लिम महिलांनी आवाज उचलला. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले होते. पण राज्यसभेत हे विधेयक विरोधकांमुळे रखडले गेले. या नव्या विधेयकातील काही तरतुदींना विरोध केल्यामुळे विधेयकाला मंजूरी मिळाली नव्हती. पण आता केंद्रीय मंत्रिमंडळाने काही तरतुदींमध्ये किरकोळ बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यात या विधेयकात बदल होणार असून मुस्लिम संघटना आणि शरीयातील नियमांचा विचार देखील केला जाणार आहे.

अजामीनपत्र गुन्हा असून मिळणार जामीन

‘तिहेरी तलाक’ आणि ‘निकाह हलाला’ या मुस्लिम प्रथांविरोधात मुस्लिम महिलांनी आवाज उठवला होता. त्यानंतर तिहेरी तलाक गुन्हा असून पतीला अटक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली होती. पण आता अजामीनपत्र गुन्हा असूनही आता मॅजिस्ट्रेटकडून आता आरोपी पतीला जामीन मिळणे शक्य होणार आहे. पण पतीला अटक करुन काहीच होणार नाही असा आरोप मुस्लिम महिलांनी केला होता. त्यापेक्षा पतीला अटक झाल्यानंतर अटक महिलेला निर्वाह भत्ता देण्याची मागणी काँग्रेसने उचलून धरली होती.

लोकसभेत काय झाले?

लोकसभेमध्ये तिहेरी तलाक हा गुन्हाच असल्याचे विधेयक मंजूर झाले होते. लोकसभेत या विषयाला घेऊन गदारोळ देखील झाला. पण हे विधेयक अखेर एकमताने मंजूर झाले. त्यानंतर मुस्लिम विवाह संरक्षण हक्क म्हणून हे विधेयक मांडण्यात आले. यातील मसूद्यात पतीने महिलेला तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणे अवैद्य ठरवले. शिवाय कोणत्याही सोशल मीडियावरुन आणि पत्रातून दिलेला तलाक हा ग्राह्य धरला जाणार नाही, असे म्हटले होते. असे करणाऱ्याला त्वरीत अटक आणि तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा द्यावी असे नमूद केले होते.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही वर्षांपासून तिहेरी तलाकच्या अनेक घटना घडल्या. दुबईत राहणाऱ्या एका मुस्लिम माणसाने आपल्या पत्नीला सातासमुद्रापार व्हॉटसअॅपवरुन तलाक दिला होता. त्यानंतर अशा अनेक घटना समोर आल्या. या अनिष्ट प्रथांविरोधात मुस्लिम महिलांना आवाज उठवला. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेत गेले.

‘तिहेरी तलाक’ म्हणज नेमकं काय ?

इस्लाम धर्मात ‘तत्काळ तिहेरी तलाक’ किंवा ‘तलाक-उल-बिद्दत’ ही लग्न संपवण्याची ही पद्धत आहे. कोणत्याही माध्यमाच्या साहाय्याने हा तलाक पती- पत्नी कळवतात. तीन वेळा तलाक म्हटले की, लग्न मोडते असे काही मुस्लिम बांधवाचे म्हणणे आहे. तर काही जण कुराणात अशा पद्धतीचा उल्लेख नाही तर तलाकसाठी एक पद्धत असल्याचे सांगितले.