किती डास मारले ते मोजू का? – व्ही.के.सिंग

बालाकोटमधील हल्ल्यात मृत पावलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी मागणाऱ्यांना, माजी सेना प्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री वी.के.सिंह यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.

Mumbai
Union Min VK Singh slams oppositions on Balakot dead count issue (2)
माजी सेना प्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री वी.के.सिंह
पाकिस्तानने ‘एअर स्ट्राईक’ दरम्यान पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्लात नेमके किती दहशतवादी मारले गेले याची ‘आकडेवारी’ सादर करा, अशी मागणी विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. राजकीय वर्तुळामध्ये सध्या हा ‘आकडेवारी’चा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. दरम्यान, माजी सेना प्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री वी.के.सिंह यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये या प्रश्नाला उत्तर देत, आकडेवारी मागणाऱ्यांना चांगलाच टोला हाणला आहे. वी.के.सिंह यांनी ट्वीटरद्वारे म्हटलं आहे की, ‘रात्री साडे तीनच्या सुमारास खूप डास होते. मी HIT मारलं. आता किती डास मेले हे मी मोजत बसू की आरामात झोपून जाऊ’. सिंह यांच्या या उपरोधिक ट्वीटवरुन हे स्पष्ट होत आहे की, बालाकोट हल्ल्यातील मृत दहशतवाद्यांची आकडेवारी मागणाऱ्यांनाच त्यांनी हे चोख उत्तर दिलं आहे. सिंह यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

दरम्यान, विकास सिंह यांच्या या ट्वीटला काही लोकांनी सोशल मीडियावर ट्रोलही केलं आहे. ‘डास त्यांचं काम करत आहेत… तुम्ही तुमचं काम करा’ अशा प्रकारच्या कमेंट्स त्यांच्या ट्वीटरव केल्या जात आहेत. मान सिंह फौजदार बीजेपी या नावाच्या अकाउंटवरुन ‘हे काम भाजपचं आहे, तुम्ही झोपून जा’, अशी कमेंट करण्यात आली आहे. एकंदरच विकास सिंह यांनी केलेल्या या उपरोधिक आणि खोचक ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात कोणत्या नव्या वादाला तोंड फुटणार का? हे येणारी वेळच सांगेल.

सौजन्य सोशल मीडिया

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here