म्हणून डॉ. हर्षवर्धन यांनी साकारली जनक राजाची भूमिका

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी रामलीला नाटकात राजा जनक यांची भूमिका साकारली. त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून लोकांना संदेश दिला आहे.

New Delhi
harshvardhan

राजकीय नेत्यांना आपण राजकारणात टीका करतांना किंवा भाषणे देतांना अनेकदा बघीतलं आहे. मात्र फार कमी राजकीय नेते हे राजकारणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात सक्रिय असताना दिसतात. अशाच प्रकारचे उदाहरण नुकतेच दिल्लीत बघायला मिळाले आहे. देशाची राजधानी दिल्लीच्या प्रसिद्ध लव-कूश रामलीला नाटकात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राजा जनकची भूमिका केली. यानाटकात त्यांच्यासोबत अभिनेत्री रितू शिवपुरी ही दिसली. आपल्या अभिनयाचे फोटो डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांच्या या अभिनयाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. लोकांना पर्यावरणाबद्दल संदेश देण्यासाठी डॉ. हर्षवर्धन यांनी रामलीलामध्ये सहभाग घेतला.

काय दिला संदेश

लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती होण्यासाठी ही भूमिका सकारण्यात आली. या भूमिकेसाठी डॉ. हर्षवर्धन यांनी खूप महेनत घेतली. स्टेजवर आपला अभिनय साकारण्यापूर्वी त्यांनी अनेकदा या भूमिकेचा सराव केला. त्यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले आहे. स्टेजवर उपस्थीत राहून त्यांनी आपले संवाद खूप चांगल्या पद्धतीने म्हटले. नाटकादरम्यान राम बरोबर बोलतांना ते म्हणाले की, “प्रदुषणमुक्त वातावरणात रहाण्याची तुझी इच्छेबद्दल मला माहिती आहे.” हा त्यांचा संवाद रंगभूमीवर गाजला.