आम्हाला घाबरून विरोधक एकवटले – नितीन गडकरी

ज्यांचे विचार कधी जुळले नाहीत ते आज आमच्या भितीने एकवटले असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. सपा-बसपा एकत्र निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर गडकरी यांनी हे वक्तव्य केले.

New Delhi
Nitin_Gadkari
नितीन गडकरी

निवडणुकीच्या तोंडावर सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांनी निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”आता सर्वे लोक एकत्र होत आहेत. जे एकमेकांकडे बघत नव्हते, नमस्कार पण करत नव्हते ते आता गळ्यात हात टाकून फिरण्याचे नाटक करत आहेत. यांच्यात मैत्री जर कोणी घडवून आणली असेल तर ते आम्ही आहोत. आमच्या भितीमुळे ते एकत्र झाले आहेत. आमच्याबरोबर ते लढू शकत नाहीत त्यांना पराभव दिसत आहे यामुळे ते एकत्र येत आहेत.” असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

काय आहे मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांनी भाजपची झोप उडवून टाकली आहे. आगामी लोकसभा निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय सपा आणि बसपा या पक्षाने घेतला आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी दिल्लीमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये दोन्ही पक्षांनी आघाडी केल्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. दोन्ही पक्ष ३८-३८ जागांवर निवडणुक लढवणार आहेत. सपा- बसपाने दोन सीट मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. यावेळी मायावतींनी सांगितले की, आम्ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही. मात्र अमेठी आणि रायबरेली काँग्रेससाठी सोडत आहोत. अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रायबरेलीमध्ये सोनिया गांधी अध्यक्षा आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here