Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात, पत्नी आणि स्वीय सहाय्यकाचा...

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात, पत्नी आणि स्वीय सहाय्यकाचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी कर्नाटकमधील उत्तरा कन्नड येथे अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये श्रीपाद नाईक जखमी असून त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर दोघांनाही त्वरित सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर होत आहे. पण गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीने रुग्णालयात अखेर श्वास घेतला आहे.

माहितीनुसार अपघात झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या कारमध्ये सहा लोकं प्रवास करत होते. नाईक हे येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झाला. दरम्यान या अपघातासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेत. तसेच अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याची संवाद साधला आणि श्रीपाद नाईक यांच्या उपचाराकरिता योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितली.

या भीषण कार अपघातामध्ये श्रीपाद नाईक यांचा स्वीय सहाय्यक यांचे निधन झाले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून श्रीपाद नाईक यांच्यावर सर्वातोपरी उपचार करण्यास सांगितले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद पाटील हे रुग्णालयात पोहोचले आहेत.

- Advertisement -