Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्मृती इराणी यांनी ट्विट करत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.

स्मृती यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, “क्वचित मला एखादं गोष्टी जाहीर करताना शब्द शोधावे लागतात. मी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर चाचणी करावी अशी विनंती करते.”

- Advertisement -

बिहार विधानसभा निवडणुकीत स्मृती इराणी भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधत होत्या. यापूर्वी, भाजपचे आणखी एक प्रचार स्टार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसेन हे निवडणूक प्रचारादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलं. त्यानंतर त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. स्वत: शाहनवाज हुसेन यांनी कोरोनाला संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.

- Advertisement -