घरदेश-विदेशदेवदर्शनासाठी इथे पुरुष येतात महिलांसारखे नटून

देवदर्शनासाठी इथे पुरुष येतात महिलांसारखे नटून

Subscribe

केरळमधील मंदिरातील अनोखी परंपरा

प्रत्येक देशातल्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या रितीभाती आहेत. काही ठिकाणच्या मंदिरांमध्ये महिलांना जाण्यास बंदी आहे. तर काही मंदिरांमध्ये पुरुषांना जाण्यास मज्जाव आहे. पण केरळच्या एका मंदिरात तर अनोखी प्रथा जोपासली जाते. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुरुषांनी महिलांसारखे तयार होऊन प्रवेश करावा लागतो.

केरळमधील श्री कोत्तानकुलांगरा देवी मंदिर

केरळच्या कोल्लम जिल्ह्यातल्या श्री कोत्तानकुलांगरा देवी मंदिरातली ही प्रथा आहे. या मंदिरात दरवर्षी चाम्याविलक्कू हा सण साजरा केला जातो. या सणासाठी वेगवेगळ्या गावांमधून पुरुष भक्त महिलांच्या वेषात देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या पुरुषांना महिलांच्या वेषात तयार होण्यासाठी मंदिर परिसरात वेगळी मेकअप रुम तयार करण्यात आली आहे. या सणासाठी पुरुष फक्त महिलांसारखी साडीच नाही तर दागिने, संपूर्ण मेकअप, केसांना गजरा लावून सजतात आणि नटतात.

- Advertisement -

फक्त पुरुषच नाही तर तृतीयपंथी देखील देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी महिला, तृतीयपंथी यांनाही परवानगी आहे. पण पुरुषांना जर मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यांना महिला वेषातच जावे लागेल. त्यांना महिलांसारखे सोळा श्रृंगार करून पूजा करावी लागते, अशी या मंदिराची अख्यायिका आहे.
गावकरी मंडळींच्या सांगण्यानुसार, या मंदिरातली देवीची मूर्ती ही स्वत: प्रकट झाली आहे. या मंदिराचे खास वैशिष्ट्य हे असं एकमेव मंदिर आहे. ज्याच्या गाभाऱ्याला छत नाही. या अनोख्या प्रथेमुळे या गावाची चर्चा सर्वदूर पसरली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -