घरट्रेंडिंगमुलांच्या 'त्या' व्हायरल सेल्फीवर, बिग बी म्हणाले...

मुलांच्या ‘त्या’ व्हायरल सेल्फीवर, बिग बी म्हणाले…

Subscribe

हा अनोखा 'स्लिपर सेल्फी' सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बॉलीवूडनेही त्याची दखल घेतली आहे.

काही लहान मुलं हातात चक्क स्लिपर घेऊन सेल्फी काढतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या मजेशीर फोटोमुळे सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. जगभरातून लोक या फोटोचं आणि त्यातील मुलांच्या निरागसतेचं कौतुक करत आहेत. दरम्यान, सध्या हा फोटो इतका स्पेशल झालाय की थेट बॉलीवूडमध्येही त्याची चर्चा रंगू लागली आहे. बॉलीवूडचे कलाकारही या ‘स्लिपर सेल्फी’वर भरभरुन कमेंट्स देत आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी तर ‘मला हा फोटो फोटोशॉप केलेला वाटतो’ अशी प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. सोशल मीडियावर कधी कोण आणि कसं व्हायरल होईल? याचा काही नेम नसतो. त्याचप्रमाणे सध्या हा फोटो आणि त्यातील लहान लहान मुलं रातोरात ‘सोशल मीडिया स्टार’ बनली आहेत.

आता हा फोटो कुणी मुद्दामहून काढला आहे? की फोटोतील त्या छोट्या मुलांनी निरागसपणे अशी पोझ दिली आहे? की मग ही फोटोशॉपसारख्या एखाद्या सॉफ्टवेअरची कमाल आहे? या प्रश्नांची उत्तरं अजून समोर आलेली नाहीत. मात्र, या फोटोची पॉप्युलॅरिटी सध्या वाढली आहे हे मात्र नक्की. दरम्यान, बिग बी अमिताभ यांच्यासोबत बी-टाऊनच्या अन्य काही कलाकारांनीही या ‘स्लिपर सेल्फीवर’ आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पाहुया, या फोटोवर काय म्हणतायत बॉलीवूड सेलिब्रिटी….

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -