‘देशातील करदात्यांचा पैसा माझ्यावर वाया घालवू नका’

देशातील अनेक बँकांचे पैसे बुडवणारा आणि भारतातून फरार झालेला मद्य व्यापारी विजय माल्ल्या यांनी ब्रिटनच्या कोर्टात माझ्याविरोधात खटला चालविण्यासाठी भारतीय करदात्यांचा पैसा वाया घालवू नका, असे म्हटले आहे.

Mumbai
प्रातिनिधीक फोटो
भारतीय करदात्यांचा पैसा माझ्यावर वाया घालवू नका- विजय मल्ल्या

मद्य सम्राट आणि देशाचे सुमारे ९ हजार कोडी बुडवून लंडनमध्ये फरार झालेला उद्योगती विजय माल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय माल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील समुहाबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय करदात्यांचे पैसे एसबीआय वाया घातलवत आहे, असे माल्ल्याने म्हटले आहे. तसेच मी बुडवलेले पैसे देण्यास तयार आहे. मात्र, ‘ब्रिटनच्या कोर्टात माझ्या विरोधात खटला चालवण्यात भारतीय करदात्यांचा पैसा वाया घालवू नका’, असे विजय माल्ल्या यांनी आवाहन केले आहे. एसबीआय शिवाय अनेक बँकांचे पैसे परत न करता फरार झालेल्या विजय माल्ल्याची भारतात आणण्यासंबंधीत प्रयत्न सुरु आहेत.

खर्चाची आरटीआयच्या माध्यमातून चौकशी करा

नुकतेच ब्रिटन हायकोर्टाने विजय माल्ल्याचे आयसीआयसीआय बँकेच्या लंडन येथील शाखेमध्ये २ लाख ६० हजार पाऊंड रक्कम जमा आहे. मात्र, ही रक्कम काढण्यासंबंधी विजय माल्ल्याला रोखण्यात आले आहे. तसेच ब्रिटन हायकार्टाने जामिनाची याचिका फेटाळून माल्ल्याचा डाव मोडीत काढला आहे. दरम्यान, भारतीय करदात्यांचा पैसा भारतातील वकिल ब्रिटनमध्ये चमकण्यासाठी वापरत आहेत. तसेच ब्रिटनमधील वकिलांवर करदात्यांचे किती पैसे खर्च केले जात आहेत. यासंबंधी माहिती अधिकाराच्या अंतर्गत (आरटीआयच्या) माध्यमातून कोणीच कसे विचारत नाही. ही माहिती का पुढे येत नाही, असा प्रश्नही माल्ल्याने उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here