घरदेश-विदेशUnlock 5: सात महिन्यानंतर सुरु होणार चित्रपटगृह; जाणून घ्या काय आहेत नियम

Unlock 5: सात महिन्यानंतर सुरु होणार चित्रपटगृह; जाणून घ्या काय आहेत नियम

Subscribe

अनलॉक ५ मध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून देशातील चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, जलतरण तलाव आणि मनोरंजन पार्क उघडली जाणार आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्ससाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही. आजपासून चित्रपटगृह सुरु होणार असल्यामुळे चित्रपटगृहाच्या मालकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्राने जारी केलेल्या नियमांनुसार चित्रपटगृहामधील एकामागून एक जागा रिक्त राहील, चित्रपटगृहात केवळ ५० टक्के लोकांनाच प्रवेश मिळणार आहे. चित्रपटगृहात प्रवेश करणाऱ्यांना मास्क घालणं अनिवार्य असणार आहे. आत वेंटिलेशनची योग्य व्यवस्था करणे आवश्यक असून एसीचे तापमान २३ डिग्रीपेक्षा जास्त असायला हवं.

- Advertisement -

रिकाम्या सीटवर क्रॉस मार्क

ज्या सीटवर लोकंना बसायचा नाही आहे, त्या सीटवर क्रॉस मार्क असेल. चित्रपटगृाच्या आत जाण्यासाठी मोबाईलमध्ये आरोग्य सेतु App असणे आवश्यक आहे. चित्रपट पाहताना कोणत्याही प्रकारची वस्तू खाण्यापिण्यावर पूर्ण बंदी असेल. तिकिट खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल. चित्रपटगृहामधील एन्ट्री आणि एक्झिट गेट, लॉबी वेळोवेळी स्वच्छ केली जाईल आणि प्रत्येक शोनंतर सिनेमा हॉल साफ केला जाईल. सर्वांना सॅनिटायझर प्रदान करण्याची जबाबदारी चित्रपटगृह व्यवस्थापनाची असेल. गुरुवारपासून PVR चे ४८७ स्क्रीन सुरु होणार आहेत.


हेही वाचा – पोट भाजपचं दुखतंय पण बाळंतकळा राज्यपालांना; शिवसेनेचा राज्यपालांवर टीकेचा बाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -