घरदेश-विदेशउन्नाव बलात्कार प्रकरण - आरोपी कुलदिप सेनगरच्या भावाचा मृत्यू

उन्नाव बलात्कार प्रकरण – आरोपी कुलदिप सेनगरच्या भावाचा मृत्यू

Subscribe

उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोपी असलेला भाजपचा माजी आमदार कुलदिप सिंग सेनगरच्या लहान भावाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोपी असलेला भाजपचा माजी आमदार कुलदिप सिंग सेनगरच्या लहान भावाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. शनिवारी ही घटना घडली. मनोज सिंग सेनगर असे त्यांचे नाव होते. कुलदिप सेनगर यांच्या उन्नाव बलात्कार प्रकरणी अटकेच्या घटनेचा मनोज दिल्लीत राहून पाठपुरावा करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, छातीत दुखू लागल्याने मनोज यांना शनिवारी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल करताच थोड्याच वेळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. तिहार जेलमध्ये तुरुंगात असलेल्या कुलदिप सिंग सेनगर यांच्या केसचा मनोज सेनगर पाठपुरावा करत होते.

- Advertisement -

मनोज सेनगर यांच्यावरही होता आरोप

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कार अपघात प्रकरणी निर्दोष सुटलेल्या ९ आरोपींपैकी एक मनोज सेनगल होता. २८ जुलै रोजी उन्नाव बलात्कार प्रकणातील पीडित तिचे दोन नातेवाईक आणि वकीलासोबत उत्तरप्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यातून कारमधून प्रवास करत होती. त्यावेळी एका ट्रकच्या धडकेत त्यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात पीडित आणि तिच्या वकिलाला गंभीर दुखापती झाल्या. तर तिच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला होता.

अपघातातून वाचल्यानंतर उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने, आपल्या जीवाला धोका असून संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लिहिले होते. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने या प्रकरणाशी संबंधित ५ केसेस उत्तरप्रदेशच्या बाहेर चालवण्यास तसेच पीडितेला सीआरपीएफचे संरक्षण देण्याचा आदेश दिला.

- Advertisement -

दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीस सादर झालेल्या या प्रकरणातील पहिल्या आरोपपत्रात या प्रकरणाची चौकशी करणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) म्हटले होते की, पीडितेच्या कार आणि ट्रक मध्ये झालेला अपघात सेनगरने रचलेला कट नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -