Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर देश-विदेश प्रियकराची फेसबुक लाईव्ह करत मंदिरात आत्महत्या

प्रियकराची फेसबुक लाईव्ह करत मंदिरात आत्महत्या

Agra
lover suicide at temple
प्रातिनिधिक छायाचित्र

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील रैभा या गावात प्रियकराने मंदिरात आत्महत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने ही आत्महत्या केली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करत असताना संबंधित प्रियकराने त्याचे फेसबुक लाईव्हही केले. बावीस वर्षीय युवकाचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र मुलीचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा झाल्यामुळे युवक नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याने चार पानांची सुसाईड नोट लिहून आपल्या कुटुंबाची माफी मागितली आहे. तसेच आपल्या शरीरातील अवयवांचे दान करावे, अशीही इच्छा या युवकाने पत्रात व्यक्त केली आहे.

आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे संबंधित युवकाची लाईव्ह आत्महत्या त्याचे अनेक मित्र पाहत होते. आपल्या या निर्णयाबाबत त्याने काही मित्रांना आधीच कल्पना दिली असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत युवकाचे नाव श्याम शिकरवार आहे. स्थानिकांनी युवकाचे प्रेत मंदिरात लटकलेले पाहील्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली.

चार मिनिटांच्या या लाईव्हमध्ये श्यामने माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नका, असे आवाहन पोलिसांना केले आहे. याचबरोबर त्याने कुटुंबातील सदस्यांना त्याचे काही फोटो फेसबुकवर टाकण्याची विनंती केली आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये त्याने लिहीले की, मला तिची आठवण येते आणि मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मला आता सहन होत नाही की तिचे दुसऱ्या कोणाशी लग्न होत आहे. तिला गमावण्याच्या दुःखात माझी नोकरीही गेली आहे.”