घरताज्या घडामोडीप्रेमात अडथळा केल्यामुळे बहिणीची आत्महत्या; संतापलेल्या प्रियकराने केली भावाची हत्या

प्रेमात अडथळा केल्यामुळे बहिणीची आत्महत्या; संतापलेल्या प्रियकराने केली भावाची हत्या

Subscribe

प्रेमात अडथळा केल्यामुळे बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या आणि हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. एका प्रेमप्रकरणामुळे बहिण-भावांना आपले प्राण गमवावे लागले आहे. प्रेमसंबंधांमध्ये भावाने अडथळा केल्यामुळे बहिणीने आत्महत्या केली. ही घटना कळताच संतापलेल्या प्रियकराने भावाची हत्या केली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमके काय घडले?

बुलंदशहरातील सिकंदराबादमधील एका तरुणाची १२ नोव्हेंबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली असता, हे प्रेम प्रकरण असल्याचे समोर आले. एका तरुणीचे मुलावर प्रेम होते, मात्र, त्यांच्या प्रेमात तिच्या भावाने अडथळा आणल्याने तिने आत्महत्या केली. ही बाब ज्यावेळी प्रियकराला कळली त्यावेळी त्याने तिच्या भावाला संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची गोळ्या घालून हत्या केली.

- Advertisement -

अशी आली घटना उघडकीस

मुलाची हत्या करण्यात आल्याप्रकरणी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामवीर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता, वडिलांनी सांगितले की, आकाश नावाच्या तरुणाचे आपल्या घरी जाणे-येणे होते. आपल्या मुलीशी तो छेड काढत होता. तसेच तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. याबाबत समजताच रामवीरने त्याला समज दिली होती. मात्र, तो सतत मुलीची छेड काढत असल्याने तिने ८ नोव्हेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली, अशी माहिती मुलीच्या वडिलांकडून सांगण्यात आली. याबाबत आकाशला कळताच त्यांनी १२ नोव्हेंबरला रामवीरच्या घरी गेला आणि त्याला गोळ्या घालून ठार केले.

पोलिसांनी या घटनेबाबत आकाशकडे चौकशी केली असता मुलीचे आणि तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले. या संबंधामध्ये भावाचा अडसर होता. भावाच्या अडसरामुळे तरुणीने आत्महत्या केली. याबाबत मला कळल्यानंतर मी त्याचा खून केल्याची कबुली आकाशने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकाश, त्याचा भाऊ कपिल आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कपिला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सोलापूर-पुणे राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात; ३ जण ठार, १० जण जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -