घरCORONA UPDATEयोगींचे धक्कादायक विधान; मुंबईतून आलेल्यांपैकी ७५ टक्के मजूर कोरोनाबाधित

योगींचे धक्कादायक विधान; मुंबईतून आलेल्यांपैकी ७५ टक्के मजूर कोरोनाबाधित

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नुकतेच त्यांनी महाराष्ट्रातील सरकार कामगारांना न्याय देण्यात अपयशी झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्राबाबत एक विधान केले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातून परतलेले ७५ टक्के लोक हे कोरोनाबाधित असल्याचे धक्कादायक विधान योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर सर्व स्तरातून टिका होत असतानाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी योगींना कोडींत पकडले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी २३ मे रोजी घेतलेल्या एका वेबिनारमध्ये सदर वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, “मुंबई-महाराष्ट्रातून परलेल्या कामगारांमपैकी ७५ टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. दिल्लीतून आलेल्यांपैकी ५० टक्के आणि इतर राज्यांमधून आलेल्यांपैकी लोकांना २० ते ३० टक्के संसर्ग झालेला आहे. आतापर्यंत राज्यात २३ लाखांच्या आसपास कामगार आले असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आमची ७५ हजार जणांचे आरोग्य पथक दिवसरात्र काम करत आहे. स्क्रिनिंग, टेस्टिंग आणि योग्य उपचारांमुळे आम्ही कोरोनाच्या संक्रमणाला नियंत्रणात ठेवले आहे.”

- Advertisement -

योगींच्या या दाव्यावर मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत २५ लाख कामगार परतले आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या आकड्यावर विश्वास ठेवला तर मग उत्तर प्रदेशमध्ये १० लाख लोकांना कोरोना झालेला आहे? मात्र सरकारने तर राज्यात फक्त ६,२२८ रुग्ण असल्याचे सांगितले आहे. मग योगींनी सांगितलेले आकडे आले कुठून? त्याला काही पुरावा आहे का?”, अशा प्रश्नांची सरबत्ती प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर केली आहे.

- Advertisement -

“उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण असतील तर टेस्टची संख्या कमी का आहे? का उत्तर प्रदेशच्या इतर आकड्यांप्रमाणे ही देखील एक धुळफेक आहे? जर योगीजींच्या म्हणण्यात तथ्य असेल तर कोरोना चाचण्यांची संख्या आणि आरोग्य व्यवस्थेच्या सर्व उपायांची माहिती जनतेला कळली पाहीजे”, अशीही मागणी प्रियांका गांधी यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी योगींनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत यापुढे उत्तर प्रदेशातील कामगार कोणत्याही राज्याला हवे असल्यास त्यांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासाठी युपीमध्ये मायग्रेशन कमिशन स्थापन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले होते. योगींच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राज ठाकरेंनी सांगितले की, “यापुढे आमची परवानगी घेऊनच महाराष्ट्रात यावे, अन्यथा आम्ही येऊ देणार नाही.” पालघर येथील साधूंची हत्या असो वा सामनाचा अग्रलेख आणि आता महाराष्ट्रातील स्थलांतरीत मजुरांबाबतचे वक्तव्य योगी आदित्यनाथ महाराष्ट्राबद्दल आकस ठेवून बोलतात, हे आता समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -